तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे,
सध्या देशात छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharajv हे एकाच जातीचे, धर्माचे राजे होते, असे चित्र तयार केले जात आहे. मात्र, शिवाजी महाराज हे एकाच जाती-धर्माचे राजे नव्हते, महाराजांनी सर्व धर्मांचा आदर केला. शिवाजी महाराज हे अठरापगड जातींचे राजे होते, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, चांदूर रेल्वेतर्फे शहरातील जि. प. शाळेच्या मैदानावर आयोजित Shivaji Maharaj शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी बोलत होत्या. यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या की, Shivaji Maharaj शिवरायांनी स्वराज्य उभारले, मात्र जातीभेद केला नाही. आता तर जातीजातीचे विभाजन करायचे आणि जातीचे विष पेरायचे काम होत आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात कायम स्त्रियांचा आदर केला, परंतु आताचे सत्ताधारी हे स्त्रियांचा अपमान करीत आहे, असे सांगून सुषमा अंधारे यांनी भाजपा, हिंदुत्व याविरोधात भरपूर तोंडसुख घेतले. भाजपाचे शिवरायांवरील प्रेम बनावट असल्याचेही त्या म्हणाल्या. महापुरुषांच्या विचारांनी आम्हाला ताठ राहणे शिकविले आहे. कुणाच्या अंगावर शाई फेकण्यापेक्षा निवडणुकीत त्यांच्याविरोधात शाई बोटाला लावा. हा खरा लोकशाहीचा लढा असेल व तो याच पद्धतीने लढला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. शिव जयंतीच्या निमित्याने सर्वजण जाती धर्माच्या भिंती जमीनदोस्त करू या, माणूस म्हणून एकत्रित येवून महाराष्ट्राचे सुराज्य करण्यासाठी एकवटूया असे आवाहन शेवटी सुषमा अंधारेंनी केले. जवळपास 1 तास त्यांनी व्याख्यान दिले.
या कार्यक्रमात माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, डॉ. सागर वाघ, माजी खासदार अनंत गुढे, शिवशाहीर भगवान गावंडे, बाळासाहेब हिंगणीकर, डॉ. राजू ठाकूर, माजी जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, उत्तरा जगताप, तुकाराम भस्मे, राजू पांडे, बाळासाहेब राणे, जयंत देशमुख, अमोल होले, संजय चौधरी, पंकज वानखडे, निशीकांत जाधव, निलेश मुंदावने यांसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमात शिवगर्जना कौतुक डोंगरे याने म्हटले. यावेळी प्रास्ताविक डॉ. सागर वाघ यांनी केले तर माजी आमदार वीरेंद्र जगताप, अनंत गुढे, तुकाराम भस्मे यांची भाषणे झाली. Shivaji Maharaj संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक राऊत यांनी केले.