हिंगणघाट आगारात पहिल्यांदाच 10 नवीन बसेस दाखल

- आ. कुणावारांच्या तगाद्याने

    दिनांक :22-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
Bus Station : आपल्या नेत्यांनी आपल्याला कार्यसम्राट ही पदवी दिली. त्या पदवीला डाग लागू द्यायचा नाही. दिलेला शब्द पाळणे हा आपला स्वभाव आहे. हिंगणघाट आगारातील कमी बसेस मुळे आपल्या मतदार संंघातील प्रवाशांची आभाळ होत होती. त्यांना खाजगी प्रवास करावा लागत होता. त्यांची अडचण लक्षात घेऊन येथे नवीन बसेस आपण्यासाठी आपण प्रयत्न केले असून 10 बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे काही भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आपल्या मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीची हेळसांड होणार नाही, याची आपण दक्षात घेत असल्याचे आ. कुणावार यांनी 10 बसेस हिंगणघाट आगारात दाखल झाल्यानंतर तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.
 
Bus Station
 
हिंगणघाट एसटी बस डेपोमध्ये (Bus Station) गाड्यांची संख्या कमी असल्याने एसटीने प्रवास करणार्‍या नागरिक तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कोरोनाकाळात अनेक ठिकाणच्या बस फेर्‍या या बंद पडल्या होत्या. हिंगणघाट आगारात नवीन बसेस मिळाव्यात याकरिता आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त यांच्याशी सतत पत्र व्यवहार करत हिंगणघाट डेपोची समस्या अवगत करून 40 नवीन बसेसची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात 10 नवीन कोर्‍या बसेस उपलब्ध झाल्या. आजपर्यंत हिंगणघाटच्या नशिबी जुन्या आणि खटाराच बसेस होत्या. बर्‍याच गाड्या 10 लाख किमीच्या वर चालल्याने त्या कुठेही बंद पडत होत्या. या नवीन गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. लवकरच उर्वरित गाड्या दाखल होतील असे आ. कुणावार यांनी सांगितले.