सडक अर्जुनी नपं सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

    दिनांक :22-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
सडक अर्जुनी, 
सडक अर्जुनी (Sadak Arjuni) नगरपंचायतच्या सभापतीपदाच्या निवडणुका मंगळवार, 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या. त्यामध्ये महिला व बालकल्याण सभापती दीक्षा भगत, बांधकाम सभापती अंकित भेंडारकर, पाणीपुरवठा सभापती शाहिस्ता शेख व उपाध्यक्ष वंदना डोंगरवार यांच्याकडे स्वच्छता समिती कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये कोणतेही मतदान न घेता निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली.
 
dtgrd 
 
महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दीक्षा भगत यांचा एकच अर्ज दाखल झाला. पाणीपुरवठा सभापतीपदासाठी शाहिस्ता शेक, अंकित भेंडारकर, असलेस अंबादे यांचा अर्ज झाला. यामध्ये शाहिस्ता शेख यांना पाणीपुरवठा सभापतीपद प्राप्त झाले तर काँग्रेसचे अंकित भेंडारकर यांना बांधकाम सभापतीपद मिळाले. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राकाँचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, राकाँचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, माजी समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी, महेश डुंबरे, दिलीप गभणे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष तेजराव मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक शशी टेंभुर्णे, आनंद अग्रवाल, देवचंद तरोणे, अनिल राजगिरे, असलेस अंबादे, गोपीचंद खेडकर, सायमा शेख, कामिनी कोवे, कमलादेवी अग्रवाल, रजनी परिहार, रेणू अग्रवाल, स्वीकृत सदस्य राजकुमार हेडाऊ व रीता लांजेवार उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार गणेश खताळे, कर अधिकारी निहाल नायकवडी व नितीन मोठे यांनी भूमिका पार पाडली.