मेडशी,
स्वच्छ भारत मिशन टप्पा २ व १५ वित्त Medshi Grapan आयोग अंतर्गत मेडशी ग्रामपंचायतला ४३.४५ लक्ष रुपये जिप मधून मिळणार असून, लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी दिली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक Medshi Grapan सुचनेनुसार मेडशी ग्रामपंचायतला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिप मधून ३०.४५ लक्ष व १५ वित्तीय आयोगानुसार १३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये मेडशी ग्रामपंचायत एक घंटा गाडी, गरजेनुसार कचरा कुंड्या लावणार आहे. तसेच ग्रामपंचायत भूमिगत गटार योजना राबविणार आहे. या कामांची लवकरच सुरुवात होणार असून, मेडशी ग्रामपंचायतला जिप मधून निधी खेचून आणण्यासाठी जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिप मुख्यकार्यकारी अधिकारी पंत, सरपंच, जिप सदस्य, पस सदस्य, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी परिश्रम घेतले.