वाशीम,
तालुयातील भटउमरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक smart education शाळेला डॉ. दामोदर काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व भाजपचे सर्कल प्रमुख गोलू काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन स्मार्ट टिव्ही भेट मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता व्हिडीओ व चित्रांच्या माध्यमातून शिकविणे सोपे होणार आहे.
सध्याचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग असून, smart education शिक्षणातही डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. मात्र, सरकारी शाळांमध्ये खाजगी शाळासारख्या सुविधा उपलब्ध होत नाहीत हेच लक्षात घेऊन येथील ग्रामस्थ शाळेला डिजीटल करण्यासाठी भरघोस अशी मदत करत आहेत. यातूनच शाळेतील प्रत्येक वर्गात आता एक - एक स्मार्ट टीव्ही बसवण्यात आला आहे. भटउमरा येथील डॉ. दामोदर काळे यांचे काही दिवसांपूर्वीच आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव डॉ. विजय काळे यांच्याकडून शाळेला एक स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला आहे. डॉ. दामोदर काळे यांचे बंधू सदाशिव काळे यांच्या हस्ते हा टीव्ही शाळेला भेट देण्यात आला. या आधीही काळे परिवारा कडून तीन स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला आनंदा काळे, विनोद काळे, शिक्षक मोहन कांबळे, समाधान गिर्हे, मोहन देवळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष हरिभाऊ काळे, विनोद इंगळे, कैलाश राजगुरू व गावकर्यांची उपस्थिती होती.