आमदार डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नांने बाभुळगाव शहराला 5.10 कोटींचा निधी

23 Feb 2023 19:40:13
बाभुळगाव, 
मागील कार्यकाळातही आमदार Dr. Ashok Uike डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नांनी बाभुळगाव शहराला 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून नगर पंचायतची प्रशासकीय इमारत व शहराची वाढती लोकसं‘या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी टाकी ही कामे करण्यात आली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच आ. डॉ.उईके यांनी शहर विकासासाठी पुढीलप्रमाणे कामे मंजूर केली आहेत.
 
 
Ashok uike
 
सरस्वती स्कूल ते जुने मटण मार्केट रस्ता व नाली 15 लक्ष, सुनील गुप्ता ते श्रीराम मुळे व शेख कादर यांचे घर लादीकरण 10 लक्ष, संदीप वांढरे ते गजानन नन्नोरे यांचे घर नाली, संजय खोडे ते संजय राऊत यांचे दुकान फूटपाथ व नाली 50 लक्ष, संतोष बाहे ते संजय राऊत यांचे घर सिमेंट रस्ता 15 लक्ष रुपये. तसेच भैया इंगोले ते शुभम दामेधर यांचे घर सिमेंट रस्ता 12 लक्ष, शुभम ठाकरे ते अरुण हिवरकर यांचे घर नाली 10 लक्ष, जितेश जिवतोडे ते एसके मोबाईलपर्यंत सिमेंट रस्ता 18 लक्ष, प्राथमिक शाळा ते राजेंद्र चन्ने यांचे दुकान, राजू शेळके यांचे घर ते कबरीस्थान व शुभम लोया यांचे घर नाली 18 लक्ष, अभय गुगलियांचे घर ते सुरेश वर्मा यांचे घर सिमेंट रस्ता 10 लक्ष, गितेश्वर नक्षणे यांचे घर ते गोपाल शर्मा यांचे घर सिमेंट रस्ता 10 लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत.
 
 
 
गोलू अलोणे यांचे घर ते हनुमान मंदिर गट्टू बसवणे 10 लक्ष, गजानन पंधरे यांचे घर ते अशोक मडावी यांचे घर सिमेंट रस्ता व नाली 7 लक्ष, आठवडी बाजारमध्ये हायमास्ट दिवे 5 लक्ष, श्रीराम मुळे यांच्या घराजवळ हायमास्ट दिवे 5.5 लक्ष, भारतमाता चौकमध्ये हायमास्ट दिवे 5 लक्ष, छत्रपती शिवाजी महाराज गार्डनमध्ये हायमास्ट दिवे 5 लक्ष, छोटे बस स्टॉप हायमास्ट दिवे 5 लक्ष, बकरी बाजार जवळील नदीवरील पूल 1 कोटी रुपये खर्च होणार आहेत. पोलिस ठाण्यामध्ये पोलिस पाटील सभागृह 25 लक्ष, बकरी बाजारपासून रामदेवबाबा मंदिर ते सांस्कृतिक भवन सिमेंट रस्ता 25 लक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक ते मंगेश घोडे यांचे घर सिमेंट रस्ता 15 लक्ष, नदीवर घाट व संरक्षण भिंत 1 कोटी, स्मशानभूमी सौंदर्यीकरण 10 लक्ष, स्मशानभूमीत गट्टू बसवणे 10 लक्ष असा भरघोेस निधी आ. Dr. Ashok Uike डॉ. अशोक उईके यांनी उपलब्ध करून दिला आहे.
Powered By Sangraha 9.0