नागपूर,
Umesh Yadav भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले. उमेश यादवचे वडील तिलक यादव यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून उमेश यादवचे वडील आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचास सुरू होती. औषध उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी उमेश यादवशी चर्चा केली होती. त्यानंतर उमेशने त्याच्या वडिलांना नागपूरमधील घरी आणलं होतं.
उमेश यादवचे वडील तिलक यादव Umesh Yadav हे वलनी कोळसा खाणीत काम करायचे. कुस्तीची आवड असलेले तिलक यादव हे उत्तर प्रदेशातल्या पडरौना इथून नोकरीच्या निमित्ताने नागपूरमध्ये आले होते. कोळसा खाणीत काम मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्येच वास्तव्य केलं.