वनव्यवस्थापन समितीचे गठण नव्याने आवश्यक

    दिनांक :24-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर, 
Forest Management मागील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून नव्याने निवडणुका होवुन नवीन पदाधिकारी विराजमान झाले आहे. त्यामुळे नवेगावबांध येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठण नव्याने करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन नवेगांवबांध राष्ट्रीय उद्यानाच्या विकास कामाला चालना मिळेल, असे मत सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी अशोक खुणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नव्याने समितीचे गठण कलम 49 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये शासन अधिसूचना 5 आक्टो.2011 चे आधीन राहून करण्यात येते. समितीचा 10 वर्षांकरिता सुक्ष्म आराखडा तयार करुन त्यात प्रामुख्याने वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद व आदिवासी विकास विभाग यांच्या योजना समावेश करुन विकास आराखडा अंतिम करावयाचा असतो.
 
dsest
 
 
या आराखडा उपवनसंरक्षक हे मान्यता देत असून विविध विभागांचा निधी वापरणे अपेक्षित असते. समितीची निवड आमसभेत करुन समितीत 12 ते 24 सदस्य कार्यकारी असावेत. Forest Management ते आपला अध्यक्ष व इतर पदाधिकारी करतात. एक तृतीयांश सदस्य हे ग्रामपंचायतचे व यात 50 टक्के महिला असावेत. शासन अधिसुचनेप्रमाणे अनु.जाती,अनु.जमाती, भटके विमुक्त व इतर यांना योग्य प्रतिनिधित्व द्यावायचे आहे. समितीचे सरकारी व खासगी असे 2 खाते राहतात. नवेगावबांध हे सर्वोच्च पर्यटन स्थळ असून समितीचे खाजगी खात्यात दरवर्षी 50 ते 60 लक्ष रुपये जमा होऊ शकतात व या निधीतून गावविकासासाठी मोठे काम करता येऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी विचार करुन आपली समिती निवडावी व चुकीची माणसं समितीत असणार नाही याची व्यवस्था दक्षता घ्यावी, असेही खुणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मी 35 वर्षं वन विभागात सेवा दिली आहे. त्यामुळे वन समितीचे महत्व जाणतो. कोणतीही अपेक्षा न ठेवणार्‍या कार्य करणारे पेरे पाटील सरपंच, पोपटराव पवार या सारखे व गाडगेबाबांचा विचार ठेऊन कर्तव्य बजावणार्‍यांनी समिती अध्यक्षपदी येण्याची इच्छा करावी, असे मतही अशोक खुणे यांनी व्यक्त केले आहे.