पुणे,
माजी आमदार देवीसिंह शेखावत devisingh shekhawat यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात शुकवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती होत. devisingh shekhawat
शुक्रवारी सकाळी देवीसिंह शेखावत devisingh shekhawat यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते अमरावतीचे पहिले महापौर होते. दोन दिवसांपूर्वी देवीसिंह शेखावत devisingh shekhawat यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्याच्या केईएम रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह ७ जुलै १९६५ रोजी झाला होता.
devisingh shekhawat देवीसिंह शेखावत शिक्षण क्षेत्रातही खूप सक्रिय होते. १९७२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. देवीसिंह शेखावत १९८५ मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ते विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. devisingh shekhawat कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य असलेले डॉ. शेखावत हे १९८५ मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते.
ते १९९१ मध्ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. १९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.devisingh shekhawat अनेक दशके ते अमरावतीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. devisingh shekhawat गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या निधनाविषयी शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे