वर्धा,
शेतमाल काढणी हंगाम सुरू झाल्या बरोबर loan scheme आर्थिक निकड भागविण्यासाठी शेतमाल विकणे हा एकमेव पर्याय शेतकर्यांकडे असतो. त्यामुळे सुरवातीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दरामध्ये घसरण होते. याव्यतिरिक्त शासनाचे आयात निर्यात धोरणसुद्धा शेतमालाचे दर न वाढण्यासाठी कारणीभुत ठरतात. कृषी उत्पन्न बाजार समितीतील तारण योजनेचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.
अॅड. कोठारी पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत loan scheme शेतकर्यांची आर्थिक निकड भागवता यावी म्हणून बाजार समितीच्या माध्यमातून 1992 पासून ज्या शेतकर्यांना आर्थिक निकडीमुळे किंवा जागेच्या अभावामुळे शेतमालाची विक्री करावी लागते अशा शेतकर्यांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतमालाची साठवणूक करून बाजार समितीकडे तारण कर्जाची मागणी केल्यास बाजार समितीमार्फत वार्षिक 5 टक्के व्याजदारावर 6 महिन्यांकरिता शासनाद्वारे निर्धारीत केलेल्या आधारभूत दर किंवा प्रचलीत बाजारातील दर यापैकी जे कमी असेल त्याच्या 75 टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून वितरीत करण्यात येते. समितीने सन 2022-23 या हंगामामध्ये 219 सोयाबीन व 1 तूर असे 220 शेतकर्यांना 2 कोटी 42 लाख 74 हजार रुपयांचे तारण कर्ज वितरीत केले आहे. सध्यस्थितीत चना व तूर या शेतमालाचा काढणी हंगाम सुरू झाला असुन तुरीचे दर शासनाद्वारे निश्चित केलेल्या आधारभूत दरापेक्षा 1 हजार रुपयांनी जास्त आहेत तर कापसाचे दर अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने शेतकर्यांची कापूस विक्री मंद गतीने सुरू आहे. शासनाद्वारे चन्याचे आधाराभूत दर 5 हजार 335 रुपये निश्चित केला असुन बाजार आवारातील दर 4 हजार 500 ते 4 हजार 800 पर्यंत आहेत. शासनाने आधारभूत दराने चन्याची खरेदी करण्याच्या दृष्टीने आभासी नोंदणीसुद्धा सुरू न केल्याने शेतकर्यांमध्ये शासनाकडून आधारभूत दराने लवकर खरेदी सुरू न केल्यास मागील हंगामामध्ये जो त्रास झाला तसाच त्रास होईल काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांची यावर्षी एकंदरीत दयनिय परिस्थिती लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर चना खरेदीसाठी आभासी नोंदणी सुरू करून आधारभूत किमतीने खरेदी सुरू करण्याची शेतकरी मागणी करीत असल्याचे अॅड. कोठारी यांनी सांगितले.
ज्या शेतकर्यांना चणा विकायचा नाही. loan scheme परंतु, आर्थिक अडचण किंवा जागेअभावी विक्री करावी लागत असल्यास शेतकर्यांनी वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करून वखार पावतीसह 2022-23 या हंगामातील पीकपेरा असलेला चालू वर्षाचा 7/12 समितीकडे सादर केल्यास शेतकर्याला 5 टक्के व्याजावर पणन महामंडळाच्या अटी व शर्थीच्या अधीन राहुन 75 टक्क्यांपर्यंत तारण कर्ज वितरीत करण्यात येईल तसेच वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेला शेतमाल शेतकर्यांनी कर्ज रकमेचा भरणा करून 6 महिन्याच्या आत उचल केल्यास वखार महामंडाळाकडुन गोदाम भाड्याची रक्कम आकारण्यात येईल त्या रक्कमेच्या अर्धी रक्कम शेतकर्यांना देण्यात येते, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, शेषकुमार येवलेकर, ओमप्रकाश डालिया, उत्तम भोयर, सुुरेश सातोकर, राजेश मंगेकर, विनोद वानखेडे, संजय तपासे, अशोक उपासे, राजेश कोचर, बळीराम नासर, बापुराव महाजन, सुरेश वैद्य, पंकज कोचर, संजय कातरे, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे आदी उपस्थित होते.