तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
विदर्भ केसरी शंकरपटाच्या (Shankarpat) अखेरच्या दिवशी सामान्य आणि क गटात काट्याची झुंज पाहायला मिळाली. या उत्कंठावर्धक थरारात मध्य प्रदेशातील ‘चपरी-डोंगरी’ या जोडीने मानाचा एक लाखाचा पुरस्कार पटकावला. दोन गटात प्रत्येकी 15 पुरस्कार आयोजकांच्या वतीने देण्यात आले. डोळ्यांचे पारणे फेडणार्या या शंकरपटाने यवतमाळची एक नवी ओळख निर्माण केली आहे. युवा महोत्सव समिती आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विदर्भ केसरी (Shankarpat) शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. दोन गटात 115 बैलजोड्या यावेळी धावल्या. सर्वाधिक चुरशीच्या सामान्य गटात अजीन पटेल यांच्या ‘चपरी-डोंगरी’ जोडीने 6 सेकंद 21 पॉइंटमध्ये निर्धारित अंतर गाठून एक लाखाचे बक्षीस मिळविले. तर दुसरे बक्षीस दोन वेगवेगळ्या जोड्यांना त्यांनी समान वेळेत अंतर पार केल्याने विभागून देण्यात आले.
पळसखेड येथील दादा पाटील आणि करोडी येथील मनोहर चव्हाण यांच्या बैलजोडीने 6.24 पॉइंटमध्ये अंतर गाठले. त्यांना 71 हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. वाघापुरातील आकाश राजा राऊत यांच्या ‘राजा-बादशाह’ जोडीने तिसरा क्रमांक पटकावला. या जोडीने 6.27 पॉइंटमध्ये अंतर गाठले. त्यांना 51 हजारांचा तिसरा पुरस्कार मिळाला. चौथ्या क्रमांकावर घारफळ येथील समीर पाटील, करोडी येथील मनोहर चव्हाण, पारवा येथील कौतिक अनिल राठोड यांच्या जोडीने पटकावला. या जोडीने 6.34 सेकंदांत अंतर पूर्ण केले. 31 हजारांचा पुरस्कार या जोडीला देण्यात आला. निट्टू तिवारी यांच्या बैलजोडीने 6.36 सेकंदांत अंतर पार करीत पाचवा 21 हजारांचा पुरस्कार पटकावला. बाळासाहेब मांगुळकर यांच्या जोडीने 6.40 सेकंदांत अंतर पार केले. त्यांच्या बैलजोडीला 12 हजारांचे सहावे बक्षीस मिळाले.
शिकदरा येथील आयुष सतीश गवारे यांच्या बैलजोडीने 11 हजारांचे सातवे बक्षीस मिळविले. या जोडीने 6.46 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण केले. बैतुलच्या रामप्रसाद राठोड यांच्या बैलजोडीने 6.55 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण केले. या जोडीला आठव्या क्रमांकाचा 10 हजारांचा पुरस्कार देण्यात आला. नामदेव यादव यांच्या जोडीने 7.11 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत 15 हजारांचे बक्षीस पटकावले. क गटात पार पडलेल्या (Shankarpat) स्पर्धेत पुलगाव येथील कोमल नंदूरकर यांच्या जोडीने सहा सेकंद 27 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत 31 हजारांचे पहिले बक्षीस मिळविले. घारफळ येथील समीर पाटील, संगम हिवरा येथील साहेबराव पाटील आणि पुसद येथील लखण जाधव यांच्या बैलजोड्यांनी 6.30 सेकंदांत अंतर पूर्ण करीत दुसर्या क्रमांकाचे 21 हजारांचे बक्षीस मिळविले. हिवरा संगम येथील साहेबराव पाटील यांच्या जोडीने 6.33 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत तिसर्या क्रमांकाचे 15 हजारांचे बक्षीस मिळविले.
वाशिम येथील आतिश वर्मा यांच्या जोडीने 6.36 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत चौथ्या क‘मांकाचे 10 हजारांचे बक्षीस मिळविले. सावर येथील सादिक शाह यांच्या जोडीने 6.46 सेकंदांत अंतर पूर्ण करीत पाचव्या क‘मांकाचे 9 हजार 1 रुपयांचे बक्षीस मिळविले. फाळेगाव येथील अद्विका लांडगे, नाचनगाव येथील विशाल उमक, शिवणी येथिल अजिम पटेल यांच्या जोडीने 6.52 सेकंदांत अंतर पूर्ण करीत सहाव्या क्रमांकाचे 8 हजार 888 रुपयांचे बक्षीस मिळविले. यवतमाळातील नामदेव यादव यांच्या जोडीने 6.55 सेकंदांत अंतर पूर्ण करीत 9 हजार 999 रुपयांचे बक्षीस मिळविले. कुर्हा येथील विनोद दमये यांच्या जोडीने 6.58 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत 7 हजार 777 रुपयांचे बक्षीस मिळविले. (Shankarpat) शिगरवाडी येथील मांगिलाल महाराज आणि वडद येथील विनायक जाधव यांच्या जोडीने 6.61 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण करीत 5 हजार 555 रुपयांचे बक्षीस मिळविले.
बक्षिसांचे वितरण करताना किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, वर्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक इंगोले, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, माजी नगरसेवक सुमीत बाजोरिया, कैलास सुलभेवार, विजय मोघे, दीपक सुलभेवार, निट्टू तिवारी, राजाभाऊ राऊत, नामदेव जाधव, पंकज मुंदे उपस्थित होते. कार्यक‘मासाठी आयोजन समितीचे निट्टू तिवारी, नितीन मिर्झापुरे, विवेक गावंडे, आकाश राऊत, पंकज मुंदे, नामदेव यादव, राजाभाऊ राऊत, अंकुश वानखडे, शुभम लांडगे, सौरभ तिवारी, हिमांशू सुलभेवार, शुभम तिवारी, तेजस तिवारी, अनुराग तिवारी, नाजीम सोरटीया, लकी सुलभेवार, आशुतोश दुल्लरवार, राहुल राऊत यांच्यासह युवा महोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण (Shankarpat) शंकरपटाचे सूत्रसंचालन राजू मंडाळे यांनी केले.