नागपूर,
स्वप्नपूर्ती कलाकेंद्राच्यावतीने कथ्थक Ritika Dalal नृत्यांगना रितीका दलाल यांच्या नृत्याचे आयोजन शुक्रवार, २४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सिव्हील लाईन्स वेस्ट हायकोर्ट रोडवरील फाईन आर्ट सोसायटी सभागृहात करण्यात आले. या नृत्याविष्काराला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रितीका दलाल यांनी कथ्थक या ललित कलेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
Ritika Dalal या नृत्यप्रकारात त्या विशारद असून देवानंद गडीकर, ललिता हरदास व निलाक्षी सक्सेना हे त्यांचे गुरू आहेत. कोराडी येथील मॉडर्न स्कूल येथे त्या नृत्य शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नागपूरसह इतरही शहरात त्यांनी नृत्याविष्कार सादर केला आहे. तर नुकतेच खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन येथे आयोजित विविध कला स्पर्धांचे त्यांनी परीक्षण केले आहे.
(सौजन्य:अनिरुद्ध पांडे,संपर्क मित्र)