स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गर्दे वाचनालय येथे पुण्यतिथी साजरी

    दिनांक :26-Feb-2023
Total Views |
बुलढाणा, 
गर्दे वाचनालयात स्वातंत्र्यवीर Savarkar विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जि.टी. कुळकर्णी, अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण समाज तथा जेष्ठ विधिज्ञ पि. डी. कविमंडण अध्यक्ष ब्राह्मण सभा, बुलढाणा आणि वाचनालयाचे उपाध्यक्ष मा श्री. बाबा वरणगांवकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
 
 ftyh
 सुरवातीला मान्यवरांचा Savarkar परिचय करून देण्यात आला. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वि.दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या मनोगतात अ‍ॅड. कविमंडण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत त्यांच्या जाज्वल्य व्यक्तिमत्वाचा अणि त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचे दाखले देत. बुलढाणा येथे सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा आणि त्या साठी समाज बांधव तथा सर्वच नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बल्लाळ यांनी केले या कार्यक्रमाला वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे संचालक आशुतोष वाईकर, ग्रंथपाल सातपुते मामा तथा धनंजय देव, अनिकेत दांदडे, मिना कुळकर्णी, अर्चना देव, वर्षा पाथरकर, अश्विनी वाईकर अंजली उंद्रिकर तथा वाचक सभासद उपस्थित होते.