बनगाव पाणी पुरवठा योजनेची 1.20 कोटी थकबाकी

- लाभान्वित गावांचा पाणी पुरवठा होणार बंद?

    03-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Water Supply Scheme : आमगाव, सालेकसा तालुक्यातील 40 गावांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक ग‘ामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद ग‘ामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कार्यान्वित आहे. ग‘ामपंचायती लाभार्थ्यांकडून वेळेवर पाणी कराची वसुली करीत नसल्याने 1 कोटी 19 लाख 94 हजार 417 रुपयांचे पाणीकर थकले आहे. ज्या ग‘ामपंचायतींकडे 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचे पाणी कर थकीत आहे, अशा गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे. तशी सूचना देखील ग‘ामपंचायतींना देण्यात आली आहे.
 
Water Supply Scheme
 
बनगाव पाणीपुरवठा योजना सन 2008 मध्ये सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यापासून कधी वीज पुरवठा खंडित, कधी जलवाहिणीला गळती तर कधी देखभाल व दुरुस्तीचे काम करणार्‍या कंपनीला पैसे न देणे यामुळे बंद पडत आहे. विभागाबरोबरच काही जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी योजना सुरू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत. परंतु, शुद्ध पाणी वापरणारे नळ जोडणीधारक पाणी कर वेळेत देण्यात उदासीन आहेत. ग‘ामपंचायतींचे पाणीकर वसुलीचे नियोजनही ढिसाळ आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडे पाणीकर वेळेवर जमा होत नाही. परिणामी, योजना राबविण्यात यंत्रणेला नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रकारामुळे जिप प्रशासन कठोर धोरण अवलंबविणार आहे. ज्या ग‘ामपंचायतीकडे 1 लाखापेक्षा अधिकचे पाणीकर शिल्लक आहे, अशा ग‘ामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे.
 
 
आमगाव नपवर 8.60 लाखांचे पाणीकर
आमगाव नगरपरिषद हद्दीत 8 गावांचा समावेश आहे. पैकी 7 गावे लाभक्षेत्रात येतात. आमगाव नगरपरिषदेकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची 8 लाख 60 हजार 662 रुपये थकबाकी आहे.
 
 
योजनेच्या लाभक्षेत्रातील ग‘ामपंचायतींच्या सरपंच, ग‘ामसेवकांनी त्वरित पाणीकराची थकबाकी वसूल करून जमा करावी. अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. याला संबंधित ग‘ामपंचायत जबाबदार राहील. असा कळकळीचा ईशारा मु‘य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिला आहे.