-शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात केली कानउघाडणी
कोलकाता,
तपासाबाबत सीबीआयवर अजिबात विश्वास नसल्याचे परखड मत व्यक्त करीत, Calcutta High Court कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात संबंधित केंद्रीय तपास संस्थेची चांगलीच कानउघाडणी केली. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याचा सीबीआयकडून तपास सुरू असून, आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने तपासाबाबत सीबीआयच्या बेजबाबदारपणावर नाराजी व्यक्त केली तसेच तपास पथकातील अधिकार्यांच्या संपत्तीची माहिती देण्याचा आदेश दिला.
Calcutta High Court न्यायालयाचा सीबीआयवर अजिबात विश्वास राहिला नसून, या तपासासाठी लंडनमधील एमआय-5 या तपास संस्थेची गरज निर्माण झाल्याचे आपणास जाणवत असल्याचे न्यायालयाने म्हटले. पुढील सात दिवसांत या प्रकरणात प्रगती होणे गरजेचे असून, तसे दिसून न आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही बजावले.
फाईलला हात लावता कामा नये
दरम्यान, मागील मंगळवारी सुद्धा Calcutta High Court कलकत्ता उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले. कर्तव्यात बेजबाबदारपणा केल्याबद्दल न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांनी एक अधिकारी सोमनाथ विश्वास यांना तपास पथकातून दूर करीत कोणत्याही फाईलला हात लावता कामा नये, अशा शब्दांत बजावले.