श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती उद्या

    03-Feb-2023
Total Views |

sdf 
 
आमगाव,
Laxman Rao Mankar दरवर्षीप्रमाणे श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती शनिवार 4 फेब‘ुवारी 2023 ला दुपारी 12 वाजता स्थानिक भवभूती महाविद्यालयात साजरी होत आहे. समारोहाचे उद्टन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते खा. सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खा. अशोक नेते, माजी विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय ठाकरे उपस्थित राहतील. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत व उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या परिसरातील कर्मठ व्यक्तींचा व गुणवंत सत्कार करण्यात येईल. जयंती समारोहाला परिसरातील जनतेने बहुसं‘येने उपस्थित राहण्यसचे आवाहन संस्थेचे सचिव केशवराव मानकर, कार्यक‘माचे संयोजक प्राचार्य डॉ. पी. के. रहांगडाले यांनी केले आहे.