राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस होणार साजरा

    03-Feb-2023
Total Views |
- शासनाचे परिपत्रक जारी
 
मुंबई, 
वर्षभरात विविध दिवस साजरे केले जातात. त्यातच आता राज्यातील सर्व शाळांमध्ये aji-ajoba divas आजी-आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे. याबाबत शासन निर्णय झाला असून, त्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणार्‍या रविवारी हा आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी-आजोबा दिवस शाळेतही साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
Grandparents Day
 
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यावसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते aji-ajoba divas  आजी-आजोबांसोबत घालवतात. खरं तर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचे नाते फार विलक्षण असते, खास असते. आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून, हे नाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
हे उपक्रम राबवले जाणार
- सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा परिचय करून द्यावा
- आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक‘म आयोजित करावेत
- विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ ठेवण्यास हरकत नाही
- संगीत खुर्चीसार‘या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील
- आजी-आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा
- पारंपरिक वेशभूशेमध्ये आजी-आजोबांना बोलवावे
- महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक‘मांचे आयोजन करण्यात यावे
- शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात
- आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे