धाड,
श्री चक्रधर स्वामी यांच्या Jali Dev पावन पदस्पर्शाने पावन झालेलं तिर्थस्थान विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर वसलेलं जाळीचा देव ता. भोकरदन येथे दरवर्षी दांडी पौर्णिमेच्या शुभ प्रभात भव्य दिव्य अशी यात्रा महोत्सव उत्सव साजरा होत असतो. परंतु मागील काही तीन वर्षाच्या काळापासून सदर उत्सव बंद होता. दरम्यान विविध अश्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी Jali Dev सावळदबारा ता. सोयगाव जि. संभाजीनगर येथे सव्वा महिना वास्तव्य करून तेथून डोंगरदरीच्या रस्त्याने जाळीचा देव येथील घरदार जंगलातील जाळीच्या सावलीत विश्रांती घेतली होती. त्या डोंगरातील जाळीखाली थांबले म्हणून श्री क्षेत्र जाळीचा देव नाव प्रसिद्ध झाले आहे. येथील यात्रा उत्सव 7 दिवस एक सप्ताह चालणार आहे. यात्रेत सिनेमा थियेटर, लोकनाट्य मंडळ, मौत का कुव, सर्कस मोठ मोठे आकाशी पाळणे, संसार उपयोगी भांडी, अनेक प्रकारची लहान मुलांची खेळणी कपडे दागदागिने असे अनेक प्रकारचे दुकान हॉटेल कोल्ड्रिंक सेंटर थाटलेले आहेत दि. 5 फेब्रुवारी रोजी महास्थानास मंगल स्नान सकळी सात वाजता श्रीमद् भगवद्गीता पारायण, 8 वाजता ध्वजारोहण, 10 वाजता धर्म ध्वजारोहण अध्यक्ष स्थानापत्र धर्मसभा, सर्व स्थानावरील भोपे पुजारी मंडळ स्थापती यांचा दुपारी 12 वाजता पंचावतार उपहार व महाआरती मा आचार्य यांचा समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा, दुपारी 1 वाजता भोजन महाप्रसाद आणि दुपारी 3 वाजता सामाजिक वधु-वर परिचय मेळावा लग्न जुळल्यास लग्न समारंभ साजरा करण्यात येणार आहे.
रात्री 8 वाजता विशाल जोगदेव सर्वज्ञ भक्तीधारा भजन संध्या, यावेळी राज्यातील पुजारी भोपे संत महंत महानुभाव यांची उपस्थिती लाभणार आहे. रात्री 8 वाजता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची रथयात्रा प.पु.लोणारकर बाबा मोठे यांच्या आश्रमातून निघणार आहे. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार असून ना. रावसाहेब दानवे पाटील, ना. चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, ना. उदय सामंत, ना. राधाकृष्ण विखे पाटील, हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, हेमंत आनंदराव अडसूळ, श्रीकांत शिंदे, अर्जुन खोतकर, प्रतापराव जाधव, प्रीतम मुंडे, संजय बांगर, संतोष दानवे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, राजेश टोपे, सुरेश भोळे विजयराव शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यात्रा महोत्सव आयोजक भोपे पुजारी मंडळाच्या वतीने प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.