उत्कृष्ट कामगीरीबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालय सन्मानित

    06-Feb-2023
Total Views |
गडचिरोली, 
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) 2 जूलै 2012 पासुन 5 हजार 230 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तसेच सन 2022-2023 या वर्षात 930 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. शस्त्रक्रिेयेत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीने जिल्हात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यातर्फे 26 जानेवारी रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 
District General Hospital
 
राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना हि जिल्हात 2 जुलै 2012 पासुन सुरु असुन सदर योजनेचे नाव 1 एप्रिल 2017 पासुन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठरविण्यात आले व त्याचसोबत 23 सप्टेंबर 2018 पासुन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासुन एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु आहे. सदर योजनेअंतर्गत पिवळे, केसरी अंत्योदय व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंब पात्र लाभार्थी आहेत. आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्डधारक व्यक्ती योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति वर्ष प्रति कुटुंब रुपये 1.50 व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देणे अनुज्ञेय असुन या योजनेअतंर्गत एकुण 1 हजार 209 शस्त्रक्रिया, औषधोपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
 
 
सन्मान सोहळ्याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोलंकी, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, प्रशासकिय अधिकारी संजय महेशगौरी, वैद्यकिय समन्वयक डॉ. गायत्री तुमडे, लेखापाल गणेश मानकर व संगणक परिचालक मंगेश नैताम यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी योजनेतील आरोग्य मित्र अथवा 07132-299046 किंवा 155388 किंवा 18002332200 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
नव्याने अंगीकृत केलेल्या रुग्णालयांची नावे
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा, उपजिल्हा रुग्णालय अहेरी, ग्रामिण रुग्णालय चामोर्शी, धन्वंतरी हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केअर गडचिरोली, सीटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केअर गडचिरोली, सींधु आर्थोपेडीक हॉस्पिटल गडचिरोली, लोक बिरादरी रुग्णालय हेमलकसा ही रुग्णालये सदर योजनेत अंगिकृत करण्यात आली आहेत.