मोठेगाव येथे सैनिकाचे स्वागत

    06-Feb-2023
Total Views |
रिसोड,
मोठेगाव येथिल रहिवासी असलेले Soldier reception नायक रंजित रमेशराव देशमुख हे २० वर्ष देशाची सेवा करुन १ फेब्रुवारी रोजी निवृत झाले असून, त्याचे ३ तारखेला मोठेगाव येथे आगमन झाले असता सर्व ग्रामस्थांनी त्यांचे वाजत गाजत उत्साहात स्वागत केले व त्यांची गावातून मिरवणूक काढली.
 

fgf

यावेळी गावातील महिलांनी Soldier reception घरासमोर रांगोळी काढुन त्यांचे औक्षण केले. तर अनेकांनी त्यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. मोठेगावातून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वात प्रथम सैन्यात भर्ती झालेले नायक रंजित देशमुख आमचा आसर्श आहेत. त्यांची प्रेरणा घेवुन गावातील ११ सैनिक मातृभूमीची सेवा करीत आहेत, अशी भावना गावकर्‍यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील आजी व माजी सैनिकही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा सोहळा अविस्मरणीय होता.