नॉर्वे देशात फक्त 40 मिनिटांची रात्र!

06 Feb 2023 19:35:44
नॉर्वे, 
जगाच्या नकाशावर युरोप खंडाच्या (Norway country) उत्तरेला असलेल्या नॉर्वेत मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास सूर्योदय होत असून, या देशात फक्त 40 मिनिटांचीच रात्र अनुभवास येते. हा भूभाग ‘कन्ट्री ऑफ मिडनाईट सन’ अशा नावानेही ओळखला जातो. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या खगोलीय प्रक्रियेमुळे जगभरात दिवस आणि रात्रीची वेळ वेगवेगळी असते. त्यामुळे याठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ वेगवेगळी दिसून येते.
 
Norway country
 
भारतात सकाळी सहा वाजलेले असतात, त्यावेळी अमेरिकेत रात्र असते. मात्र, (Norway country) नॉवे या एकमेव देशात फक्त 40 मिनिटांची रात्र अर्थात् सूर्य 40 मिनिटांसाठी मावळतो आणि त्यानंतर लगेच पहाट होत दुसरा दिवस उजाडतो. हा देश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्याने अन्य भागांच्या तुलनेत येथे हवामान अतिशय थंड आहे. नॉर्वे आर्क्टिक ध्रुवीय प्रदेश असून, मे ते जुलै महिन्यापर्यंत सुमारे 76 दिवस म्हणजेच अडीच महिने सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो. मात्र, ही परिस्थिती वर्षभर नसते.
 
 
मध्यरात्री सूर्याचा देश
या घटनेमुळे (Norway country) नॉर्वे मध्यरात्री सूर्याचा देश म्हणूनही ओळखला जातो. कमी सूर्यप्रकाशामुळे येथील लोकांना फार जास्त उष्णता मिळत नाही. उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्यामुळे कडाक्याची थंडी सोसावी लागते. या देशात बर्फाळ पर्वत आणि हिमनद्यांची संख्या अधिक आहे. मुख्य व्यवसाय पर्यटन असला तरी, जगातील श्रीमंत देशांमध्ये गणना केली जाते.
Powered By Sangraha 9.0