मंगरुळनाथ येथे भव्य खंजेरी भजन स्पर्धा

    06-Feb-2023
Total Views |
मंगरुळनाथ, 
sapt Khanjeri Bhajan राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथी तथा संत श्री बिरबलनाथ महाराज यांचे यात्रोत्सवानिमित्त मंगरुळनाथ येथे ग्रामदैवत बिरबलनाथ मंदीरात विदर्भस्तरिय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे १७ व १८ जानेवारी रोजी सकाळी ११ आयोजन करण्यात आले आहे. भजन स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांसाठी प्रथम १५ हजार रुपये, द्वीतीय १३ हजार, तृतिय ११ हजार, चतुर्थ ९ हजार, पाचवे ८ हजार, सहावे ७ हजार, सातवे ६ हजार, आठवे ५ हजार, नववे ४ हजार ५००, दहावे ४ हजार ११ वे ३ हजार ५००, १२ वे ३ हजार, तेरावे २ हजार ९००, चौदावे २ हजार ८०० रुपये पंधरावे २ हजार ७०० रुपये, सोळावे २ हजार ६००, सतरावे २ हजार ५००, अठरावे २ हजार ४००, एकोणिसावे २ हजार ३००, विसावे २ हजार २००, एकविसावे २१०० रुपये पारितोषिक देण्यात येणार असून, बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेच होणार आहे.
  
kalyan
 
सदर भजन स्पर्धेत भजन गायकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ५ भजने म्हणावी लागणार असून, मागिल वर्षाचे भजन म्हणता येणार नाही. एका स्पर्धकाला एकाच एकाच मंडळात भाग घेता येईल. बाल व महीला भजनी मंडळास याच अटीवर भाग घेता येईल. भजनी मंडळाला स्वर, ताल, शब्दोचार, साथसंगत व भजन प्रभाव यावर गुणांकण केले जाणार असून, sapt Khanjeri Bhajan परिक्षकाचा निर्णय अंतिम राहील. समान गुण मिळाल्यास नोंदणी क्रमाला प्राधान्य देण्यात येईल. पाच कडव्याचे भजन पाहुन म्हणता येईल. भजनी मंडळांना भजनाच्या याद्या सुवाच्च अक्षरात लिहुन फाईलमध्ये देणे अनिवार्य राहील. या भजन स्पर्धेत विदर्भातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी भाग घेवुन आपली भजन कला सादर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.