अहेरी नगरातील स्ट्रीट लाईट तत्काळ लावा !

(नगरसेवक अमोल मुक्कावार यांची मागणी)

    07-Feb-2023
Total Views |
आलापल्ली, 
अहेरी नगर पंचायतीच्या street light प्रभाग क्रमांक 3 व शहरातील अन्य भागातील स्ट्रीट लाईट लावून दिवाबत्तीची तत्काळ सोय करून द्यावी, अशी मागणी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
 

rrtrtrtr 
 
 
निवेदनात अमोल मुक्कावार  street light यांनी म्हटले आहे की, याआधी वारंवार सांगून, लेखी कळवूनही प्रभाग क्रमांक 3 येथील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंधारामुळे नागरिकांच्या जिविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात अहेरी नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 व अन्य भागातील स्ट्रीट लाईट न लावल्यास अहेरीच्या मुख्य असलेल्या स्व. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा ईशाराही नगरसेवक मुक्कावार यांनी निवेदनातून दिला आहे.