3.45 लाख बालकांची होणार आरोग्य तपासणी

08 Feb 2023 19:02:20
गोंदिया, 
जिल्ह्यात ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ Health अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यामधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील 3 लाख 45 हजार मुलामुलींची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील दोन महिने अभियान सुरू राहणार असून अभियाचा प्रारंभ आज 9 फेब्रवारी रोजी होत आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या 272 चमू तयार करण्यात आल्या आहेत. एकही पात्र लाभार्थी सुटू नये याची काळजी घ्याण्याची सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केली आहे.
 

y
राज्यातील ग्रामीण, शहरी Health भागातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 9 फेब्रुवारीपासून जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हाभर आरोग्य व महारक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रम, अंध, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, वसतिगृहे, खासगी नर्सरी तसेच शाळाबाह्य 0 ते 18 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची 20 ते 25 प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. अभियानात आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0