ज्येष्ठ नागरिकांची नागपूर-शेगाव सहल सफल

08 Feb 2023 09:22:29
 
sahak
 
नागपूर,
Nagpur-Shegaon हेडगेवार गार्डनतर्फे नागपूर ते शेगाव सहल आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गायधर सर आणि नेमाडे सर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सहलीसाठी विनामूल्य गाडी उपलब्ध करून दिली. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे 30 सदस्य सहलीत सहभागी झाले होते. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शेगावची व्यवस्था अतिउत्तम होती. गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी परिसरात फेरफटका मारला आणि त्यानंतर महाप्रसादही ग्रहण केला. परिसरातील स्वच्छता बघण्याजोगी होती.
सौजन्य : शशिकांत पुराडभट, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0