तभा वृत्तसेवा
वर्धा,
नागपूर कराराप्रमाणे विदर्भाच्या Vidarbha State हक्काचे सिंचनाचे 60 हजार कोटी रुपये कमी मिळाले असून सिंचनाचा अनुशेष कायम आहे. निधीअभावी विदर्भातील 131 धरणे अपूर्ण असल्याने 14 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. विदर्भात 2.57 लाख रिक्त पदं असून 14 लाख बेरोजगार आहेत. विदर्भाचा सिंचनाचा व इतर क्षेत्रातील एकूण 75 हजार कोटींचा अनुशेष भरून निघणे शक्य नसल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे मत माजी आमदार वामन चटप यांनी व्यक्त केले.
जय महाकाली Vidarbha State शिक्षण संस्था द्वारा संचालित अग्निहोत्री महाविद्यालयात आज बुधवार 8 रोजी शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात विदर्भाला स्वातंत्र्य का हवे? या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्यांनी मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर कोंडबतकुलवार, सतिश दाणी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.
यावेळी प्रभाकर कोंडबतकुलवार यांनी नागपूरला 1920 साली काँग्रेसचे अधिवेशन झाले त्यात भाषावार प्रांतरचनेचा ठराव संमत केला होता. त्याकाळी मराठी भाषिक समाज मुंबई प्रांत, हैदराबाद संस्थान, मध्यप्रांत व वर्हाड या तीन ठिकाणी विभागलेला होता. या तीनपैकी दोन ठिकाणी म्हणजे मुंबई प्रांत व मध्य प्रांत व Vidarbha State वर्हाड येथे इंग्रजांची थेट सत्ता होती व हैदराबाद संस्थान निजामांच्या ताब्यात होते. भूगोलाचा विचार केल्यास या तीन तुकड्यांना एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणे शक्य होते. यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मागणीला पाठींबा मिळत होता. नागपूर येथील साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून या मागणीला पाठींबा दिला होता. त्या संमेलनात या मागणीला पाठींबा देणारा ठरावसुद्धा संमत झाला होता, असे सांगितले.
तर पं. अग्निहोत्री म्हणाले यांनी Vidarbha State संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून आजपर्यंत विदर्भाचा अनुशेष बघितला तर पश्चिम महाराष्ट्र व मुंबई शहराचा झालेला विकास व विदर्भाचा विकास, यातील भयानक तफावत स्पष्ट दिसून येत असल्याचे सांगितले. मराठी भाषेचा आधार घेऊन व 105 हुतात्म्यांचे बलिदान देऊन अस्तित्वात आलेल्या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास झाला नसल्याचे ते म्हणाले. सतिश दाणी यांनी आपल्या प्रस्ताविक केले. संचालन प्राचार्य डॉ. जंगमवार यांनी केले तर आभार डॉ. कोठारे यांनी मानले.