जलसंपदा विभागाचे विदर्भात काम दाखवा व एक लाख रुपये मिळवा : अ‍ॅड. वामनराव चटप

08 Feb 2023 21:30:18
तभा वृत्तसेवा
वणी,
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या Adv. Vamanrao Chatap हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यांतून विदर्भ गायब झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे विदर्भात काम दाखवा 1 लाख रुपये मिळवा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले असून तसे फलक सर्व जिल्ह्यांत लावण्याचा निर्णय माजी आमदार अ‍ॅॅड. वामनराव चटप यांनी जाहीर केला.
 
Adv. Vamanrao Chatap
 
येथे एका पत्रपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना तेे म्हणाले, या संदर्भात दुर्दैवाने आपल्याच लोकप्रतिनिधींनी ‘कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ’ हा रोल पूर्णपणे अदा केला असल्याचे दिसून येत असून विदर्भातील एकही काम या Adv. Vamanrao Chatap अर्थसंकल्पात नाही. या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर समितीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला.
 
 
विदर्भ राज्य आंदोलन Adv. Vamanrao Chatap समितीद्वारे 21 फेब‘ुवारी ते 5 मार्च पूर्वेकडील कालेश्वर (शिरोबा) येथून प्रचारयात्रा निघणार असून दुसरी प्रचारयात्रा जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा येथून निघणार आहे. दोन्ही प्रचार यात्रांचा समारोप 5 मार्चला नागपूर येथे होणार आहे. याद्वारे विदर्भभर जनजागृती करून विदर्भाचे आंदोलन तीव‘ करण्याची भूमिका यातून जाहीर केली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफीक रंगरेज, राहुल खारकर, प्रा. बाळासाहेब राजुरकर, विजया आगबत्तलवार, शालिनी रासेकर, राजू पिंपळकर यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0