विज्ञान आदिवासींपर्यंत पोहोचवा : तनुश्री आत्राम

    09-Feb-2023
Total Views |
आलापल्ली, 
एटापल्ली तालुक्यात आदिवासी समुदायाचे मोठें प्राबल्य आहे. याच समुदायाचे विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात शिकतात. या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत करावे, असे Tanushree Atram आवाहन सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांनी केले. पंचायत समिती एटापल्लीच्या माध्यमाने तालुकास्तरीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनीचे आयोजन भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
 
Tanushree Atram
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Tanushree Atram तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कन्नाके होते. यावेळी गट शिक्षणाधकारी दीपक देवतळे, पोलिस उपनिरीक्षक गरकल, प्राचार्य विनय चाव्हाण, धनंजय पोटदुखे आदींची उपस्थिती होती. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 
 
पुढें बोलताना त्या म्हणाल्या की, Tanushree Atram विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य आहे. आदिवासीबहुल भागात हा उपक्रम नियमित राबविल्या जाणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे आदिवासी विद्यार्थींना कळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थांचा प्रत्यक्ष विज्ञानाशी संपर्क यावा म्हणून गुरुजनांनी प्रयत्न करावे. आदिवासी विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार सोडून आम्ही सुद्धा प्रगती करू शकतो हा विचार ठेवावा. अभ्यास व मेहनतीच्या बळावर विज्ञानासहित प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी असेही त्या म्हणाल्या. यावेळी दीपक देवतळे, गर्कल, सचिन कन्नाके यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी एटापल्ली तालुक्यात येणार्‍या शाळांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. शिक्षकांनी सुद्धा आपल्या प्रतिकृती ठेवल्या. उपस्थितांनी प्रतिकृतीचे निरीक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक देवतळे यांनी केले. संचालन प्राथमिक शिक्षक भांडारकर यांनी तर आभार उच्च माध्यमिक शिक्षक प्रशांत सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाला विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.