संघटित गुन्हेगारी मोडून काढणार : डॉ. पवन बन्सोड

09 Feb 2023 17:09:48
तभा वृत्तसेवा
महागाव, 
जिल्ह्यातीलच नव्हे तर तालुक्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. Dr. Pawan Bansod शांततेला नख लावणार्‍या गुन्हेगाराला पोलिसी खाक्या दाखवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अधीक्षक डॉ. पवन बन्सोड Dr. Pawan Bansod यांनी केले आहे. आर्णी तील प्रतिष्ठित सुवर्णकार सुरेंद्र गावंडे यांना सोनेरी टोळीने 20 लाखांचा गंडा घातला होता. अवघ्या काही दिवसातच पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेरी टोळीला पोलिसांनी गजाआड केले. पोलिस अधीक्षक यांनी कार्यतत्परता कौतुकास्पद असल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्यासह सुरेंद्र गावंडे यांनी सपत्नीक पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड Dr. Pawan Bansod यांचा सत्कार केला, यावेळी ते बोलत होते.
 
Dr. Pawan Bansod
 
महागाव तालुक्यातील अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारावर आहेत. सोबत अवैध व्यावसायिक यांची कुंडली काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला चालना देणार्‍याचीही गय केल्या जाणार नाही. महागाव तालुक्यात खोट्या तक‘ारी पोलिस ठाण्यामध्ये येत असल्याचे समोर येत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांना कानमंत्र देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी Dr. Pawan Bansod सांगितले.
 
 
महागाव पोलिस ठाणे अनेक दिवसांपासून प्रभारावर आहे. Dr. Pawan Bansod पोलिसांचे सं‘याबळही कमीच आहे. पोलिस वसाहतीचे काम संथगतीने सुरू असून याकडे पोलिस अधीक्षकांनी लक्ष वेधावे, अशी मागणी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्याशी चर्चेदरम्यान केली आहे. लवकरच याकडे स्वतः लक्ष देवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.
Powered By Sangraha 9.0