नागपूर,
Ghonas : जगातील सर्वांत महागडा साप म्हणून ओळख असणाèया आणि छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तस्करी होणारा डुरक्या घोणस साप वर्धा मार्गावरील qहदूस्थान कॉलनी येथे राहणाèया अमन मोहबे यांच्या घरी आढळला. घटनेची माहिती मानद वन्यजीव रक्षक उधमqसह यादव यांना मिळताच त्यांनी या सापाला ताब्यात घेत सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे सुपूर्द केले.
बुधवारी सकाळी ९.५३ वाजता अमन मोहबे यांना घरात या (Ghonas) सापाचे दर्शन झाले. आकाराने मोठा असणारा हा साप अजगर असू शकतो असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी मानद वन्यजीव रक्षक उधमqसह यादव यांना संपर्क करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान साप हा घरात येत असल्याने अमनने प्लॅस्टिकची बालटी सापापुढे नेली. साप त्या बालटीत गेला. उधमqसह यांनी बालटीत नेमकं कोणत्या प्रजातीचा साप आहे याची शहानिशा केली असता डुरक्या घोणस असल्याचे स्पष्ट झाले.
हा साप घरात आल्यास मोठ्या प्रमाणात धन मिळते अशा विविध अंधश्रद्धेतून या सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र वन्यजीवांप्रती सजग असणाèया नागरिकामुळे या सापाला जीवनदान मिळाले. सदर घटनेची माहिती डीसीएफ डॉ. भारतqसह हाडा यांना देण्यात आली. सदर घटनेचा पंचनामा करुन या सापाला ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राकडे सोपविण्यात आले.