मूर्तिजापूर,
Revenue Maharajaswa महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसूल विभागा अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढण्यासाठी शासन आपल्या दारी या धर्तीवर महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. गाव पातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकर्यांचे कामे गतिमान व्हावे व त्यांना त्यांच्या कार्याची पूर्तता व्हावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी हेच एक ध्येय ठेवून तालुक्यात महाराजस्व अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासन राबवित असल्याचे मूर्तिजापूर येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले.

मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालय व महसूल विभाग यांच्यावतीने शासकीय गोदाम येथे महाराजस्व अभियान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नीमा अरोरा तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते पाटील, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर कराळ, न. प च्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, नायब तहसीलदार प्रदीप पांडे, गटविकास अधिकारी अशोक बांगर आदी अधिकारी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली Revenue Maharajaswa यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या 20 स्टॉलवर प्रत्यक्ष जाऊन त्याचे निरीक्षण करून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी माहिती घेऊन, विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व त्यांच्या योजनेचे पत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रदीप पवार यांनी तर उपस्थितांचे आभार तालुका पुरवठा निरीक्षक यांनी केले.