नासाकडून भारतात पोहोचला ‘निसार’ उपग्रह

- नैसर्गिक आपत्तींची मिळणार आगाऊ माहिती

    दिनांक :10-Mar-2023
Total Views |
बंगळुरू,
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने (Nisar satellite) ‘निसार सॅटेलाईट’ इस्रोकडे सोपवला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हा निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एअर फोर्सचे सी-17 विमान बंगळुरूमध्ये उतरले. या विमानातून सिंथेटिक अपर्चर रडार भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रोकडे सुपूर्द करण्यात आले आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.
 
Nisar satellite
 
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत (Nisar satellite) निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने ‘निसार’ हा सॅटेलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे. या उपग्रहमुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग‘ह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 
2024 मध्ये लाँच होईल निसार सॅटेलाईट
नासाने ‘निसार’ उपग्रहाचे (Nisar satellite) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिंगसाठी इस्रोकडे पाठवण्यात आला आहे. आता इस्रो यावर काम करेल, त्यानंतर 2024 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, निसार उपग्रह बंगळुरू येथे दाखल झाला. इस्रोकडे नासाकडून कॅलिफोर्नियातीहून रवाना झालेला उपग‘ह पोहोचला आहे. अमेरिकन वायुसेनेच्या सी-17 विमानाने हा उपग‘ह भारतात नेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तींची मिळणार आगाऊ माहिती
निसार उपग्रह (Nisar satellite) हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल. याचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्र शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल. सर्वकाही सुरळीत पार पडले तर, निसार उपग्रह 2024 मध्ये आंध्रप्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल. हा उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.