आशा बगे जनस्थान पुरस्काराने सन्मानित

11 Mar 2023 21:09:23
नाशिक, 
साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार-2023 हा ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना शुक्रवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन Asha Bage आशा बगे यांचा सन्मान केला गेला. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
Asha Bage
 
दर दोन वर्षांनी जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात येतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने 2023चा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका Asha Bage आशा बगे यांना जाहीर करण्यात आला होता. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याला साहित्यप्रेमी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळताच मी कृतज्ञ झाले, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी देत प्रतिष्ठानचे आभार मानले. ज्ञानेश्वरी सर्व काव्यांचे मूळ आहे तसेच माणूसपणाला जपणारे कुसुमाग्रज होते. स्त्रियांच्या कवितांमुळे अनेक बदल झाले, असे त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवत कुसुमाग‘जांच्या ‘विजयासाठी कधी नव्हतीच कविता माझी’ ही कविता म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
 
 
याप्रसंगी Asha Bage आशा बगे यांनी नाशिकमध्ये 1989 साली मिळालेल्या अ. वा. वर्टी पुरस्कार तसेच त्यावेळी झालेल्या कुसुमाग्रजांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. आयुष्यातील मूलभूत आनंदाचा शोध हा प्रत्येक मोठ्या साहित्यिकाच्या साहित्यात दिसून येतो. अगदी भगवद्गीतेतही तो दिसून येतो. त्यापेक्षा अनेक पटींनी ज्ञानेश्वरीत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0