नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढवा; अन्यथा बेमुदत कामबंद

- राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक
- निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    दिनांक :11-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Grade pay : तहसीलदार राजपत्रीत वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याची मागणी केलेली होती. सतत पाठपुरावा केला. मात्र, या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. ही मागणी तत्काळ मान्य करुन तसा शासन निर्णय निर्गत करावा अन्यथा 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना आज शनिवार 11 रोजी देण्यात आले.
 
 Grade pay
 
नायब तहसीलदार पद महसूल विभागात महत्त्वाचे आहे. मात्र, या पदाचे वेतन वर्ग 2 चे नसल्याने ग्रेड पे (Grade pay) वाढविण्याबाबत 1998 पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासन स्तरावरुन कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. इतकेच नव्हेतर के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेत वेतन त्रुटी समिती समक्ष नायब तहसीलदारांचे ग्रेड पे 4800 वाढविण्याबाबत तसेच कामाचे स्वरुप, जबाबदारी आदी माहिती सांगूनही मागणीचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही.
 
 
यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. याच अनुषंगाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत मागण्या मान्य होईस्तोर राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला असून मागण्या मान्य न झाल्यास 3 एप्रिलपासून बेमुदम कामबंद आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमुद करण्यात आले. निवेदन देताना उपविभागीय अधिकारी सुरेेश बगळे, तहसीलदार रमेश कोळापे, दीपक कासार, नितीन पाटील, महेंद्र सुर्यवंशी, अजय जिले, बालुताई भागवत, समशेर पठाण, हेमा जाधवर आदींची उपस्थिती होती.