वडार समाजाला तब्बल ७५ वर्षांनी शासनाने दिला न्याय

उपमुख्यमंत्र्यांचे समाज बांधवांकडून अभिनंदन

    दिनांक :12-Mar-2023
Total Views |
वाशीम,
स्वातंत्र्योत्तर तब्बल ७५ वर्षांनी वडार समाजाला Wadar community राज्यात पहिल्यांदाच न्याय मिळालेला आहे. वडार समाजातील जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन केले. त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री निवासस्थान सागर या ठिकाणी शिवक्रांती वडार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच महाराष्ट्रातील इतर संघटना, संस्था यांचेही कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.
 
 
tdfg  
 
 
 
संपूर्ण महाराष्ट्रातून वडार समाज Wadar community संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनीं मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी दाखल झाले होते. वडार समाजाचा हा जनसागर आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वडार समाजाला इतिहासात सर्वप्रथम मिळालेल्या सन्मानाप्रति आभार व्यक्त करण्यासाठी दाखल झाला होता. वडार समाजाकडून रश्मी जाधव यांनी फडणवीस यांचे औक्षण केले व शिवक्रांती वडार समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी शिंदे, राजू जाधव, बलराज वारकर, अनिल शेलार, सदाशिव जाधव, शंकर माने यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून आभार मानले.