शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचे निर्देश!

जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

    दिनांक :12-Mar-2023
Total Views |
नागपूर,  
भारतीय हवामान विभागाच्या Instruction for farmer प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारा प्रसारित जिल्हास्तरीय अंदाजानुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक १४ व १५ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
tt  
 
 
 शेतकऱ्यांसाठी खबरदारीचे उपाय-
१. पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची काढणी व मळनीची कामे १४ मार्च पर्यंत उरकून घ्यावी.
२. कापणी व मळणी च्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टर द्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे.
३. कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा.
४. कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
५. मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे.
६. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
७. विजांच्या Instruction for farmer ठीकांनांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी - लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल अॅप चा वापर करावा तसेच विजांपासून बचावासाठी अॅप मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा.
८. दामिनी - लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) हे अॅप खालील लिंक वापरून गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे. 
 
 
महत्वाचे संपर्क क्रमांक:
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
हेल्प लाईन क्रमांक : 011 1078
नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र
दूरध्वनी 022 22027990
जिल्हा नियंत्रण कक्ष, नागपूर
दूरध्वनी : 0712 2562668