भारताने सलग चौथ्यांदा जिंकला बॉर्डर-गावस्कर चषक

13 Mar 2023 20:56:16
अहमदाबाद, 
भारत (India won) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 571 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेेलियाने सामना संपेपर्यंत 2 बाद 175 धावा केल्या होत्या. यानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना ‘ड्रॉ’ करण्याचा निर्णय घेतला.
 
India won
 
पहिले दोन कसोटी सामने भारताने जिंकले
भारतात (India won) 15 महिन्यांनंतर कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी अनिर्णित राहिली होती. ग्रीन पार्क, कानपूर येथे हा सामना झाला. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडियाने 12 कसोटी सामने खेळले असून एकच सामना अनिर्णित राहिला आहे. यादरम्यान टीम इंडियाने आठ कसोटी जिंकल्या आणि तीनमध्ये पराभव पत्करावा लागला. भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी आणि दुसरी कसोटी सहा गड्यांनी जिंकली.
 
 
सलग चौथ्यांदा भारताच्या नावावर चषक
या दोन्ही कसोटीतील विजयासह (India won) भारताने बॉर्डर-गावस्कर चषकही जिंकला. यावर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉॅफी जिंकण्यासोबतच टीम इंडियाने इतिहासही घडवला आहे. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर चषकावर कब्जा केला. जवळपास 26 वर्षांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर चषक मालिका खेळली जात आहे. मात्र कुणा संघाने सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
 
1996 पासून खेळला जात आहे चषक
दिल्ली कसोटी जिंकताच (India won) भारताने ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्याचबरोबर चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका गमावणार्‍या संघाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या. मालिका अनिर्णित राहिली असती तरी बॉर्डर-गावस्कर करंडक भारताने कायम राखला असता. बॉर्डर-गावस्कर चषक 1996 मध्ये सुरू झाला, तेव्हापासून दोन संघांपैकी केवळ भारतानेच सलग चार वेळा या स्पर्धेवर कब्जा केला आहे. 1996 पूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका या नावाने खेळली जात होती.
 
 
भारत-आस्ट्रेेलिया कसोटी मालिकेचा इतिहास
भारत (India won) आणि ऑस्ट्रेेलिया यांच्यात आतापर्यंत 16 बॉर्डर-गावस्कर चषक मालिका खेळली गेली आहे. यापैकी 11 वेळा टीम इंडियाने हा चषक जिंकला. भारताने हा चषक 1996/97, 1997/98, 2000/01, 2003/04, 2008/09, 2010/11, 2012/13, 2016/17, 2018/19, 2020/21/, 2022/23 मध्ये जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने हा चषक पाच वेळा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने 1999/00, 2004/05, 2007/08, 2011/12, 2014/15 मध्ये हा चषक जिंकला. दोन्ही संघांमध्ये एकूण 28 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 12 मालिका जिंकल्या आहेत, तर टीम इंडियाने 11 मालिका जिंकल्या आहेत. पाच मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
 
 
चौथ्या कसोटीत काय घडले?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. उस्मान ‘वाजाने 180 धावांची खेळी केली, तर कॅमेरून ग्रीनने 114 धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रेव्हिस हेडने 32 धावा, मार्नस लाबुशेन तीन धावा, कर्णधार स्टीव्ह स्मिथ 38 धावा, पीटर हँड्सकॉम्ब 17 धावा, अ‍ॅलेक्स कॅरी शून्य, मिचेल स्टार्क सहा धावा, नॅथन लियोन 34 धावा आणि टॉड मर्फी 41 धावा काढून बाद झाले. भारताकडून अश्विनने सहा गडी बाद केले. तर शमीला दोन, जडेजा आणि अक्षरला प्रत्येकी एक बळी मिळाला.
 
 
पहिल्या डावात भारताच्या 571 धावा
भारताने (India won) पहिल्या डावात 571 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेेलियावर 91 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी शुभमन गिलने 128 आणि विराट कोहलीने 186 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्मा 35, चेतेश्वर पुजारा 42, रवींद्र जडेजा 28, श्रीकर भरत 44, अक्षर पटेल 79 तर अश्विन सात धावा करून बाद झाला. उमेश यादवला खातेही उघडता आले नाही. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही.
 
 
दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाच्या 175 धावा
ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 2 बाद 175 धावा केल्या. मॅथ्यू कोमन सहा धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ट्रेव्हिस हेडला (90 धावा) अक्षर पटेलने त्रिफळाचित केले. मार्नस लाबुशेन 63 आणि स्टीव्ह स्मिथ 10 धावा काढून नाबाद राहिले. यानंतर दोन्ही संघांनी कसोटी अनिर्णित ठेवण्यावर सहमती दर्शविली.
Powered By Sangraha 9.0