सडक अर्जुनी,
विद्युत शॉक लावून रानडुकराची wild boar hunting शिकार करणार्या आरोपींना वन अधिकार्यांनी अटक केली. ही घटना येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणार्या सहवनक्षेत्र कार्यालय सौंदड मधील घाटबोरी कोहळी येथे रविवार, 12 मार्च रोजी उघडकीस आली. पुरुषोत्तम कदिरा कांबळे (40), अश्विन अंबादास बनसोड (33), मंगेश व्यंकट मेश्राम (32), मुनेश्वर दयाराम वंजारी (34) सर्व रा. घाटबोरी/पंचवटी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चारही आरोपींना जामीन दिला.
अश्विन बनसोडच्या शेतात wild boar hunting अवैद्यरित्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून रानडुकराची शिकार करण्यात आल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील जाधव यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकासह आरोपींचा शोध घेतला. दरम्यान मंगेश मेश्राम, अश्विन बनसोड, पुरुषोत्तम कांबळे व मुनेश्वर वंजारी यांना ताब्यात ताब्यात घेण्यात आले. त्यांनी रानडुकराची विद्युत प्रवाहाच्या सहायाने शिकार करून त्याचे मांस विक्री केले व उर्वरित मांस शिजवून खाल्याचे चौकशीत सांगीतले. चारही आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला. चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही जामीन दिल्याचे जाधव यांनी सांगीतले.