पृथ्वीसारख्याच जलयुक्त ग्रहाचा शोध!

    दिनांक :14-Mar-2023
Total Views |
- वजन आणि त्रिज्या दुपटीहून अधिक

ह्यूस्टन, 
पृथ्वीपासून 138 प्रकाशवर्ष दूर एका अशा ग्रहाचा शोध लागला आहे, जो हळूहळू जलयुक्त ग्रहात परिवर्तित होत आहे. हा बाह्य ग्रह मानवी वस्ती करण्यायोग्य होऊ शकतो. तथापि, या ग्रहाविषयी काही प्रमाणात रहस्य कायम आहे. या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीपेक्षा 2.25 पट जास्त आहे. म्हणजेच, त्याचे वजन पृथ्वीपेक्षा 6.1 पट जास्त आहे. या ग्रहाचे नाव HD planet एचडी-207496 बी असे आहे. याचे वातावरण गॅसने भरलेले आहे किंवा येथे संपूर्ण समुद्र आहे किंवा दोहोंचेही मिश्रण असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हा ग्रह हळूहळू आकुंचन पावत आहे. असे असले तरी, आकुंचन पावून शांत झाल्यानंतरही या ग्रहाला महा-पृथ्वी म्हणता येईल, इतका तो विशाल आहे.
 
Pruthvi
 
या HD planet गूढ ग्रहाबाबत अधिक माहिती मिळाल्यास शास्त्रज्ञांना पृथ्वीपेक्षा मोठा खडकाळ ग्रह आणि नेपच्यूनपेक्षा लहान वायू ग्रहांचे कोडे सोडवणे शक्य होईल. डेटाचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, त्यात वायुमय वातावरण आहे. सोबत मोठा समुद्रही आहे. ज्याचे नंतर पाण्यात रुपांतर होईल. जगभरातील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 5300 हून अधिक बाह्य ग्रहांचा शोध लावला आहे. 100 दिवस कमी कालावधीत ते सूर्याभोवती फिरतात तसेच ते पृथ्वीच्या दीड ते दुप्पट मोठे आहेत. या ग्रहांच्या त्रिज्यांमध्ये फरक असेल, परंतु ते दगडी असतील, तर त्यांची तुलना पृथ्वी, मंगळ, शुक्र यांच्याशी केली जाते. त्यांना महा-पृथ्वी म्हणजेच ‘सुपर अर्थ’ असे म्हणतात. मात्र, ग्रह वायुमय असेल, घनदाट वातावरण आहे, म्हणून त्याची तुलना नेपच्यूनशी केली जाते. त्यांना मिनी-नेपच्यून म्हणतात. या ग्रहांवरून त्यांचे तारे म्हणजेच सूर्य त्यांच्या किरणोत्सर्गाने या ग्रहांच्या वायूचे वाष्पीकरण करीत राहतात.
 
 
भविष्य पृथ्वीसारखे राहण्यायोग्य असू शकते!
HD planet एचडी-207496 बी चा शोध चिली येथील युरोपियन सदर्न वेधशाळेने लावला आहे. नंतर याची पुष्टी करण्याचे काम नासाच्या टेस एक्सोप्लॅनेट दुर्बिणीला देण्यात आले. हा ग्रह पृथ्वीप्रमाणे बदलत असल्याची पुष्टी त्यांनी केली. हळूहळू पाण्याच्या ग्रहात बदलत आहे. म्हणजे, भविष्यात कोणीही या ग्रहावर राहू शकेल, पण यासाठी वेळ लागणार आहे. हा ग्रह त्याच्या सूर्याभोवती 6.44 दिवसांत फिरतो. म्हणजे, त्याचा एक दिवस आमच्या मते जवळपास एक आठवडा झाला आहे, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.