द लेडी ऑफ शॅलॉट...!

Indian Culture स्वच्छता, सातत्य, उत्पादनाचा दर्जा

    दिनांक :14-Mar-2023
Total Views |
साहित्य संस्कृती 
- प्रज्ञा जयंत बापट
Indian Culture कुठल्याही शहरात, गावात, खेड्यातसुद्धा तरुण मुलामुलींच्या हातात मोबाईल असतोच. सगळ्यांच्याच जगण्याचा तो एक अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलचे चांगले-वाईट परिणाम हा एक वेगळा विषय आहे. Indian Culture सुरुवातीला मोबाईलचं आकर्षण होतं. नंतर मोबाईल सगळ्यांनाच सहज उपलब्ध होऊ लागले. मग सगळ्यांनाच त्याची सवय झाली आणि आता त्याशिवाय जगताच येत नाही अशी अवस्था आहे. प्रत्येक जण घराबाहेर पडल्याबरोबर कानाला फोन लावून बोलणं सुरू करतो. वाहन चालवतानासुद्धा मोबाईल कानाला चिकटलेला असतो. तरुणाई तर मोबाईलवर ऐकताना, बोलताना, बघताना, दाखवताना भान विसरते.Indian Culture मोबाईलच्या त्या छोट्या काचेवर डोळे जोडून बघणा-या मुली बघितल्या की, ३०-३५ वर्षांपूर्वीचे खेड्यातले दृश्य आठवते. खेड्यात नुकताच टीव्ही आला होता, काळा पांढरा...! सधन शेतक-याकडे, समोरच्या बैठकीच्या खोलीत, पोत्यांच्या थप्प्या बाजूला सारून, छप्पर गळणार नाही अशा जागेवर टीव्ही ठेवलेला असायचा. Indian Culture दिवसभर वावरात काम करून घरी आल्यावर आईला घरकामात मदत करून खेड्यातल्या त्या स्वप्नाळू वयातल्या मुली अनावर ओढीने टीव्हीसमोर येऊन बसायच्या. Indian Culture टीव्हीवरचे सगळे कार्यक्रम बघायच्या. बातम्या, जाहिराती, सिनेमे, मालिका, चर्चा, मुलाखती, भाषणं... त्यांच्यासाठी नवीन असणारं एक जग रोज त्यांना त्यांच्यासमोर दिसायचं.
 

lekh 
 
कार्यक्रम संपले की सुस्कारा सोडून कुणीतरी म्हणायची, ‘चाल गे.. उद्या सकाळी वावरात लवकर जा लागते...' टीव्हीच्या काचेपलीकडचं जग आपलं नाही हे कळत असूनही त्या आभासी जगात त्या रोज आवडीने गुरफटत जायच्या. Indian Culture आल्फ्रेड टेनिसनची एक कविता आहे, ‘द लेडी ऑफ शॅलॉट.' इंग्रजी साहित्यातील खूपच लोकप्रिय, अतिशय सुंदर, अतिशय गूढरम्य कविता. कवितेचा सारांश असा... एका नदीने वेढलेल्या बेटावर एक राजकन्या आहे. तिला एक शाप मिळाला आहे. तिने कधीच राजवाड्याबाहेर पडायचं नाही. बघायचंसुद्धा नाही. तिच्या दिवाणखान्यात खिडकीसमोर टांगलेल्या आरशात बाहेरची दिसणारी दृश्यं बघत हातमागावर कापड विणत बसायचं. शापामुळे ती असहाय होते. आरशात दिसणा-या बाहेरच्या जगाच्या प्रतिमाच तिचं जग होतात. जीवनाचे, जगण्याचे फक्त प्रतिबिंब ती आरशात बघत असते. काय काय दिसतं तिला आरशात...? शेतात काम करणारे, बाजाराला जाणारे, पाऊलवाटेवरून रमत-गमत जाणारे, जिवंत स्त्री-पुरुष. नुकतंच लग्न झालेलं जोडपं, तरुण मुलींचा घोळका, गंभीर धर्मगुरू आणि घोड्यावरून ऐटीत जाणारे तरुण सरदार... एका क्षणी त्या ख-याखु-या जिवंत माणसांच्या जगात प्रत्यक्ष जाण्यासाठी ती उठते. असोशीने, अनावर ओढीने... तीन पावलांत अंतर पार करून बाहेर येते आणि शापाचा अंमल सुरू होतो.Indian Culture 
 
 
भारलेल्या मनस्थितीत ती राजवाड्याजवळून वाहणा-या नदीतल्या होडीत बसते. तिचा ख-याखु-या जगण्यासाठी प्रवास सुरू होतो आणि तो अखेरचा ठरतो. टेनिसनने तिच्या मृत्यूचेसुद्धा गूढरम्य चित्र रेखाटले आहे. दहावी, बारावी पास होऊन खेड्यांतून शहरात येणा-या मुली, ‘लेडी ऑफ शॅलॉट'च वाटतात. त्यांनाही गरिबीचा शाप आणि कष्टाची शिक्षा असते. शेतीतल्या कष्टातून शेतीतल्या गरिबीतून जिवाच्या आकांताने सुटका करून घ्यायला, वेगळ्या नव्या प्रवासाची सुरुवात करायला त्या शहरात येतात. Indian Culture पाठीवर दप्तर, डोकं आणि चेहरा ओढणीने झाकून घेतलेला. मोबाईलच्या काचेवरची दृश्यं कधीतरी आपल्या बाबतीत खरी ठरतील अशा आशेने, शहरातल्या जगण्याचा वेग आणि स्वतःचा तोल सांभाळत नवा प्रवास सुरू होतो. शहरात राहण्यासाठी, जेवण्यासाठी, चहासाठी, आंघोळीसाठी, रोजचे कपडे धुण्यासाठीसुद्धा त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. त्यांच्या बिनधास्त वागण्या-बोलण्यातून त्यांना वाटत असलेली धास्तीच जाणवत राहते. Indian Culture खेड्यात अंधार असला, तरी तो सवयीचा असतो. शहरात रस्त्यावरच्या दिव्यांच्या झगमगाटात रस्ताच सापडत नाही. खेड्यात सज्जन आणि दुर्जन सगळेच ओळखीचे असतात. शहरात सगळेच इतके अनोळखी की, स्वतःची ओळखही स्वतःशी जाणीवपूर्वक जपावी लागते. Indian Culture शिक्षणाचा डाव मांडला तरी फासे मनासारखे पडतीलच असे नाही. पण हा मांडलेला डाव मोडायचा नाही, हेही पक्कं ठरवलेलं असतं.
 
 
Indian Culture शहरात शिक्षणाची वेगवेगळी संस्थानं, त्यांची वेगवेगळी दालनं. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपड, सरकारी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी धडपड, शिकवणी वर्गांचा शोध, अभ्यासिकांमधले पुस्तकांचे ढीग, तिथली फी या सगळ्यांशी झुंजत झगडत काही जणी खरेच यशस्वी होतात. कुठेतरी छोटी-मोठी नोकरी मिळून जाते. पण काही जणी काचेपलीकडच्या स्वप्नात स्वतःला हरवून बसतात आणि भरकटतात. काही जणी मात्र पुस्तकं वाचताना जगणंही वाचायला शिकतात. Indian Culture नोकरी मिळाली नाही तरी त्या दुभंगत नाहीत. जमेल तितके शिक्षण घेऊन त्या गावाकडे परततात आणि आत्मविश्वासाने एक वेगळा डाव मांडतात... तो जिंकण्यासाठीच! शिक्षण घेताना त्या शहरातल्या बाजारपेठेची ओळख करून घेतात. मैत्रीचे वर्तुळही वाढते ठेवतात. शहरातल्या बाजारात गावरान हा शब्द परवलीचा झाला आहे. युगात्मा शरद जोशींनी सांगितलेल्या चतुरंग शेतीतल्या माजघर शेती, व्यापारशेतीचा मार्ग त्या निश्चयाने स्वीकारतात. Indian Culture लहानपणापासून आईला मदत करताना शिकून घेतलेले, वेगवेगळे मसाले, पापड, कुरडया, सांडगे, शेवया, सांडया, मूगवड्या, बोटव्या, सरगुंडे, दह्यातल्या, धनेमेथीपूड भरून, जिरे शोपपूड भरून वाळवलेल्या हिरव्या मिरच्या, वेगवेगळी लोणची, सरबत, मुरांबे हे सगळे कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता त्या नव्या पद्धतीने शिकतात आणि पद्धतशीर विकतात.
 
 
शहरातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत योग्य आखणी करून विक्रीसाठी वेगवेगळे स्टॉल लावतात. Indian Culture झुणका भाकर ठेचा, पाटवड्याची भाजी, मांडे, मोहाच्या पुरणपोळ्या, मोहाची सोजी, बेसन खिचडी अशा खास चुलीवरच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला शहरी लोकांची गर्दी होते. भारतात नव्याने आलेल्या सोयाबीनपासून अनेक पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन त्या या निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. नवीन फॅशनप्रमाणे कपडे शिवणे, जुन्या पद्धतीने नवीन गोधड्या शिवणे, शाळेसाठी विद्यार्थ्यांचे गणवेश मोठ्या प्रमाणात शिवणे असेही उद्योग या नवउद्योजिका यशस्वीपणे करतात. Indian Culture शहरातल्या अनेक दिवाणखान्यात ह्यांनी तयार केलेल्या अनेक सजावटीच्या वस्तू दिसतात. हे सगळे करताना आर्थिक व्यवहारही त्या अचूक करतात. पापडांच्या व्यवसायापासून पतपेढी या पैशांच्या व्यवसायापर्यंत सगळे व्यवसाय करताना त्यांनी समाजाचा विश्वास मिळवला आणि टिकवला आहे. Indian Culture या श्रमलक्ष्मींनी आळस, व्यसन, निराशा, खोटा अहंकार आणि त्यापायी होणा-या भांडणांचं मळभ दूर केलं आहे. त्यांचे सरदारही नुसती गाणी गात घोड्यावरून रपेट न करता त्यांना योग्य ती मदत करतात. स्वच्छता, सातत्य, उत्पादनाचा दर्जा याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. Indian Culture त्यात तडजोड नाही. सगळ्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि कडवी शिस्त असते.
 
 
आधी स्वकष्टाने पैसा उभा करायचा; मग बँकांचे कर्जसुद्धा ऐटीत स्वीकारायचे आणि कटाक्षाने परत करायचे. Indian Culture या उद्योगांमुळे पैसा आणि नाव मिळालंच; आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढली. एकमेकींच्या मदतीने काम करण्यातला आनंद समजला. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा स्तर उंचावला. टीव्ही, मोबाईलच्या काचेवर दिसणा-या बाहेरच्या जगाने रचलेला चक्रव्यूह त्यांनी भेदला आणि यशस्वीपणे त्या बाहेरही पडल्या... तेही आपल्या अनेक मैत्रिणींसोबत! Indian Culture शेतक-यांच्या लुटीच्या व्यवस्थेविरुद्ध ही अहिंसक लढाईची आणखी एक आघाडी आहे. त्या ‘लेडी ऑफ शॅलॉट'चा आरसाच त्यांनी कोन आणि दिशा बदलून असा काही उभा केला की, आता बाहेरच्या जगालाच त्यांचं प्रतिबिंब त्यात दिसत आहे. Indian Culture आत्मभान जपणा-या, आत्मविश्वासाने वावरणा-या, मैत्री वाढवणा-या या स्वयंसिद्धांचं प्रतिबिंब सगळे जग मोठ्या कौतुकाने बघत आहे.
९४०५५०१७६९