तापी नदीच्या पात्रात सूर्याचे मनमोहक प्रतिबिंब

- पाण्यात रंगाची उधळण

    दिनांक :14-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
धारणी, 
Tapi River : मेळघाटात थंडीने निरोप घेतलेला असून तापमान वाढलेले आहे. आमनेर किल्ल्याच्या पायथ्याशी सूर्यास्ताच्या वेळी रंगपंचमीला तापी नदीच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडत असताना मनमोहक दृश्य होते.
  
Tapi River
 
मेळघाटात सर्वच नद्या आता आटलेल्या आहेत. पण तापी माता अविरतपणे वाहत आहे. तापी, गडगा, मधवा अशा तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर धारणी तालुक्यातील एकमेव आमनेर किल्ला उभा आहे. किल्ल्यासमोर तापी नदीत (Tapi River) रंगपंचमीला मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब इतके मनमोहक होते की, जणू काही सूर्यदेवता आपला चेहरा पाहण्यासाठीच थांबलेला होता, असे वाटत होते. हिंदु पुराणानुसार तापी नदी सूर्याची पुत्री आहे.
 
 
तापी नदी (Tapi River) पश्चिम वाहिनी असून मध्य प्रदेशच्या मुलताई (मुलतापी) येथून उगम झाल्यावर पूर्व ते पश्चिम वाहताना गुजरात येथील सूरत शहराजवळ सागरात सामावते. इतर कोणत्याही नदीत न सामावता आपल्याच नावाने सागरात थेट सामावत असल्याने कुमारी नदी म्हणून तापीची ओळख झालेली आहे. सूर्यास्ताच्या वेळी रंगपंचमीला मावळत्या सूर्याने आपल्या पुत्रीसोबत होळी खेळताना केसरी रंगाची उधळण केलेले मनोरम दृश्य पाहून मनाला एक आध्यात्मिक शांतीचा अनुभव होतो.