कर्मचार्‍यांच्या संपाने कार्यालयात शुकशुकाट

    दिनांक :16-Mar-2023
Total Views |
- शासनाच्या ‘त्या’ निर्णयाचा निषेध

मारेगाव, 
14 मार्चपासूनOne mission, old pension  ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करिता राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. यावर राज्य सरकारच्यावतीने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जूनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वेळकाढू असून तो आम्हास मान्य नाही, असे सांगत संपातील सहभागी कर्मचार्‍यांनी या निर्णयाचा निषेध केला. बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशी तहसील कार्यालासमोर 100 ते 150 कर्मचार्‍यांची उपस्थिती दिसून आली.
 
 
One mission, old pension
 
One mission, old pension : मारेगावातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसल्याने शुकशुकाट दिसून आला. यामुळे मात्र जनसामान्याचे हाल होताना दिसून येत आहे. सभेचे सूत्रसंचालन गौरव चिकाटे यांनी केले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे व नंतरचे सर्वच विभागातील कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. यावेळी जुनी पेन्शन संघटना, मध्यवर्ती कर्मचारी युनियन, आयबीटी संघटना, म. रा. शिक्षक समिती, कास्ट्राईब संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, ग‘ामसेवक संघटना, नगर पंचायत कर्मचारी संघटना, म. रा. कृषी सहायक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, वनविभाग कर्मचारी संघटना, तालुक्यातील अशा विविध संघटनेचे 400 ते 500 कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत.