चिखली,
विदर्भासाठी संजीवनी ठरणार्या वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पा सोबतच पैनगंगा नदी जोड प्रकल्पाला तातडीने प्रशासकिय मान्यता प्रदान करण्याची जोरदार मागणी आ. श्वेता ताई महाले Shweta Mahale यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या विभाग वार मागण्यांच्या अनुषंगाने केली . दि. 15 मार्च रोजी विधानसभेमध्ये जलसंपदा गृह विभाग उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागावर सभागृहा त चर्चा सुरू असताना त्या बोलत होत्या.
विदर्भासाठी संजीवनी ठरणारा वैनगंगा नलगंगा नदीजोड प्रकल्प खामगांव वरून पैनगंगा नदीला जोडून हे पाणी बुलडाणा जिल्ह्यातील घाट माथ्यावरील चिखली , मेहकर व ईतर तालुक्यातील तसेच पुढे वाशीम जिल्हा मार्गे चंद्रपूर पर्यंत नेण्यासाठी आ श्वेता महाले Shweta Mahale यांनी नागपुर अधिवेशनात लक्षवेधी सूचना लावली होती. त्यावर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात मागणी प्रमाणे पैनगंगा प्रकल्पाचा समावेश करून विस्तार करण्याची घोषणा केली होती. वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ देण्याचा पुनरुच्चार सुद्धा केला आहे.
वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पाणी वापरास मान्यता मिळाली असून मुख्य अभियंता जलविज्ञान व धरण सुरक्षितता नाशिक यांचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे .तसेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महामंडळाचे पत्र प्रशासकीय मान्यते करिता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करण्यात आले आहे.
परंतु या नदी जोड प्रकल्पाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने या अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचे काम पुढे सुरु झालेले नाही . वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प मूळ प्रकल्प आहे. त्याला पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचा समावेश करण्याची घोषणा झाली आहे . त्यामुळे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पा सोबतच पैनगंगा नदी जोड प्रकल्पाला तातडीने प्रशासकिय मान्यता प्रदान करून हा प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात अशी सुद्धा मागणी आ सौ श्वेता ताई महाले Shweta Mahale यांनी केली आहे.