वसुंधरा फाऊंडेशनद्वारे महिलांचा सत्कार व फॅशन शो

16 Mar 2023 18:33:09
यवतमाळ,
मागील काही वर्षांपासून यवतमाळात विविध समाजोपयोगी उपक्रमांसह महिलांसाठी विशेष कार्यक‘म तसेच विवीध स्पर्धांचे आयोजन करणार्‍या Vasundhara Foundation वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष वर्षा पडवे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विवाहित महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचेे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद पडवाळे, विशाली जाजू, डॉ. सारिका शहा, डॉ. नेहा पडवाळे, डॉ. अंजली गवार्ले, राजीक कुरेशी होते.
 
 
Vasundhara Foundation
 
या कार्यक‘मामध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणार्‍या 30 जणांचा सत्कार करण्यात आला. तर पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता पेंद्राम, अरुणा नेवारे, द्वितीय संगीता जानकर, तर तृतीय सरोज बरदेहे यांनी पटकावला. तर वेस्टर्न वेशभूषेमध्ये प्रथम क‘मांक रोहिणी ढोले, द्वितीय क‘मांक सुषमा बेंद्रे, तृतीय क‘मांक छाया चव्हाण यांनी पटकावला. या स्पर्धेत 35 जणांनी सहभाग नोंदविला होता. तसेच या कार्यक‘मांमध्ये आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन केले होते. कार्यक‘माची सुरुवात विहा पडवाळे हिने केलेल्या गणेश वंदनेने झाली. वेशभूषा परीक्षणासाठी परिक्षक म्हणून इशिता चित्ते (अमरावती), लुबा राजीक (यवतमाळ) यांनी केले. प्रास्ताविक वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्षा पडवे यांनी केले. तर सूत्रसंचालन माधुरी कोठेवार यांनी केले. कार्यक‘मासाठी Vasundhara Foundation वसुंधरा फाउंडेशनच्या सचिव स्मिता ढेकळे, प्रसाद गायकवाड, सोनसखी ज्वेलर्स यवतमाळ, योगिता मासाळ, निर्मला आडे, नेहा शर्मा, किरण शिरभाते, सुचिता नगोसे, जया सलुजा, तृप्ती मोरे, रूपाली गुल्हाणे, मीनल मेहता, अमृता वढेरा यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0