रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग...!

chandrashekhar bawankule पक्षवाढीसाठी जीवतोड मेहनत

    दिनांक :16-Mar-2023
Total Views |
दखल
- अविनाश पराडकर
chandrashekhar bawankule संघटना हा तर भारतीय जनता पार्टीचा आत्मा! या आत्म्याचा म्हणजेच ‘आतला आवाज' ऐकण्याची जबाबदारी खरे तर प्रदेशाध्यक्ष या संघटनात्मक पदावर असते. आजवरच्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षांनी या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपाच्या संघटनेचा ‘आतला आवाज' बुलंद होताना दिसतोय, हे मात्र खरं आहे. chandrashekhar bawankule  त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत एक व्यक्तिमत्त्व झटताना दिसत आहे...तहान-भूक हरपून सातत्याने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहे... कार्यकत्र्यांना विश्वासात घेत आहे, विश्वास देत आहे... काम करणा-या कार्यकर्त्यांना पुढे आणत आहे. कुठे मरगळ आली असली, तर ती झटकत त्याची कारणे समजून घेत आहे... chandrashekhar bawankule प्रेरणा देत आहे आणि प्रसंगी कठोर होत झाडाझडती घेत आहे. संघटनेला नवचैतन्य देण्यासाठी झटणा-या या भाजपा प्रदेशाध्यक्षांचे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव अलीकडे सातत्याने विरोधी पक्षांच्या टीकेचे लक्ष्य होताना दिसायला लागले आहे.
 
 

bawan  
 
 
chandrashekhar bawankule त्यांच्या कामाची दखल, खरे म्हणजे धास्तीच विरोधकांनी घेतली, असे म्हणावे लागेल. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या चंद्रपूर दौ-यात बेहबतुल्ला शाह यांच्या दर्ग्याच्या दर्शनाचे भांडवल करीत औरंगजेबाच्या मजारीवर झुकल्याचे जाहीर करीत खोटा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच याची जाणीव झाली होती. त्यानंतर शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. पुण्यातील निवडणुकीतही जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न झाला. संजय राऊत यांनीही त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. chandrashekhar bawankule कारण स्पष्ट होतं. एकीकडे महाराष्ट्रातले विश्वासघातकी ठाकरे सरकार उखडले गेले होते तर त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाली होती. पन्नास खोक्यांची ओरड करणारे आणि अन्याय झाल्याचे अश्रू ढाळत दारोदार हिंडू लागणारे ठाकरे पिता-पुत्र आता सहानुभूतीचे कार्ड वापरू लागले होते. अशा परिस्थितीत फक्त पहिली रेषा पुसून चालणार नव्हते, तर आपली रेषा वाढविण्याची गरज होती. chandrashekhar bawankule नव्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी तिथे लक्ष केंद्रित केले. संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावाती दौरा काढला. कार्यकर्त्यांच्या भावना आणि समस्या समोरासमोर जाणून घेत त्यांच्यात नवचैतन्य भरलं.
 
 
हौसला दो किसी की टूटी हुई उम्मीदों को...
सहारा दो किसी के थके हुए कदमों को...
जिद भर दी कार्यकर्ताओं मे जो आँधी में भी दिया जला दे...
जज्बा भरा ऐसा जो संघर्ष को मंजिल से मिला दे...! chandrashekhar bawankule
कार्यकत्र्यांशी थेट संपर्कातून पक्ष संघटना आणखी मजबूत होण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी धडाधड निर्णय घेतले. पत्रव्यवस्था कमी करीत एका फोनवर कामे करून घेण्याचा धडाका लावला. कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि समस्या फक्त जाणूनच घेतल्या नाहीत, तर त्यांना मार्गही दिला. विश्वास दिला. याचा परिणाम ब-यापैकी सकारात्मक झाला. chandrashekhar bawankule ठाकरेंच्या रडण्यातून निर्माण झालेल्या भावनिकतेच्या आणि सहानुभूतीच्या लाटेचे डॅमेज कंट्रोल करण्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच यशस्वी झाले. विधानसभेच्या जागांमधले गणित काही वजा काही अधिक झाले. नागपूरच्या जागेवरच्या विजयाचा आनंद आघाडीने आसुरी टीकेने साजरा केला, पण त्याचवेळी कोकणात शिक्षक परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाचे ‘कमळ' फुलवत आघाडीचे नाक कापण्याचे काम भाजपाने फत्ते केले. chandrashekhar bawankule संघटनात्मक बांधणीचा फायदा भाजपाला इतका प्रचंड झाला की आघाडीचे, विशेषत: ठाकरे पिता-पुत्रांचे रडूबाई राजकारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून उखडून टाकले गेले.
 
 
chandrashekhar bawankule महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळविले. जवळपास अडीच हजारांहून अधिक ग्रामपंचायती थेट लढतीत भाजपाने जिंकून अव्वल स्थान मिळविले तर बिनविरोध झालेल्या ब-याच ग्रामपंचायती या भाजपाच्याच होत्या. ‘सौ सोनार की एक लोहार की' असा हा दणका होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निकालाचे स्वागत करीत महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. टीका आणि टोमणेवाल्या विरोधकांकडे दुर्लक्ष करीत बावनकुळे यांच्या कामाचा आवाका आता तर अधिकच वाढत जात आहे. chandrashekhar bawankule गाठीभेटी आणि बैठकांचा जोर वाढत आहे. पक्षप्रवेशांचा तर धमाकाच चालला आहे. तसेही, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात होती, त्याचवेळी दीड हजारांपेक्षा अधिक दिग्गज काँग्रेस कार्यकत्र्यांचा भाजपात प्रवेश घेऊन बावनकुळेंनी त्या यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडवलाच होता. chandrashekhar bawankule गेल्या आठवड्यात अधिवेशन, कार्यकर्ते प्रवेश आणि प्रदेश कार्यालयात भाजपा आमदारांसोबतच्या विभागनिहाय बैठका यातून प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सततची लगबग चाललेली असते. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई-ठाणे-कोकण, विदर्भ विभागाच्या आमदारांसोबत दीर्घबैठका होत आहेत.
 
 
विरोधक जिथे गद्दारी, खोके याच्यापलीकडे जाताना दिसत नाही, तिथे महाविजय-२०२४ च्या संकल्पपूर्तीसाठी भाजपाची जोरदार पूर्वतयारी चाललेली दिसून येत आहे. chandrashekhar bawankule ‘ना सोऊंगा ना सोने दूंगा' अशा आक्रमक आणि सातत्यपूर्ण कामगिरीने बावनकुळे यांनी राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. भविष्यातला धोका ओळखून विरोधक त्यांना टीकेचे लक्ष्य बनवणार, हे तर उघडच आहे. २०२४ चा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला असताना हे तर होणारच. पण विश्वास आणि जिव्हाळ्याने पक्षाशी जोडलेले लाखो कार्यकर्ते ही लढाई लढण्यासाठी सोडाच, तर ती निर्णायक रीत्या जिंकण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले दिसत आहेत. chandrashekhar bawankule आता वेगवेगळ्या विचारधारेचे विरोधक एकत्र येत लढाई लढायला ‘मजबूर' झालेत; याचाच अर्थ भाजपाचा लढा ‘मजबूत' आहे. आता आघाडीच्या तिघाडीत उमेदवारीवरून बिघाडी होणार, हे सरळ दिसत आहे. बेघर होणारे नेते एकमेकांचे पंख कापत राहतील. आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय म्हणे! काँग्रेस ०८, राष्ट्रवादी काँग्रेस १९ आणि ठाकरे २१ अशा जागा लढवणार. त्यात ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागांमधून वंचित आघाडी वाटा मागायला बसलीच आहे. chandrashekhar bawankule भाजपासोबत गेल्या निवडणुकीत या जागा २३ होत्या. त्यात आधीच दोन थेट कापल्या गेल्यात. परत उरलेल्यात वंचित मटकावणार.
 
 
दुसरीकडे काँग्रेसला मागील निवडणुकीत २५ जागा लढवता आल्या होत्या; त्यात फक्त आठ यावेळी आघाडीने तोंडावर मारल्यात. काय नाना पटोले त्यावर आतून राजी होतील? आता लवकरच काँग्रेसची भाजप-जोडो यात्रा सुरू होईल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रात्रंदिन चाललेल्या युद्धात विजयाची दिशा उजळायची सुरुवात होईल. भाजपासाठी संकल्प हीच सिद्धी असते, महाविजयही त्यासाठी अपवाद नसेल. chandrashekhar bawankule
जब हौसला बना लिया उंची उडान का... फिर देखना फिजुल है कद आसमान का....
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली येणा-या काळात भाजपा महाविजयाची भरारी घेणार, यात शंका नाही. chandrashekhar bawankule हा निव्वळ आशावाद नाही, तर ‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती' यावरचा विश्वास आहे आणि पक्षवाढीसाठी अहोरात्र जीवतोड मेहनत घेणा-या भाजपा प्रदेशाध्यक्षांना हा शुभेच्छांसह सलाम आहे!