सर्वोदयींची दुटप्पी भूमिका !

sarvodaya ashram wardha संमेलन कोणतेही, त्यात वाद अटळच

    दिनांक :16-Mar-2023
Total Views |
वेध
- प्रफुल्ल व्यास
 
sarvodaya ashram wardha वर्धा भूमी देशात एका वेगळ्या भूमिकेत आहे. येथे महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सेवाग्राममध्ये फक्त मुक्कामच केला नाही तर येथून सूत्रेही हलवली. आचार्य विनोबा भावे यांनी तर भूदानाची पवित्र चळवळ पवनार येथून सुरू केली. मावशी केळकर यांनी महिलांसाठी राष्ट्र सेविका समितीची मुहूर्तमेढही येथूनच केली आणि देशाचा मध्यबिंदू म्हणजे झिरो माईलही वर्धा जिल्ह्यातच आहे. sarvodaya ashram wardha हा जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या तीन प्रभृतींच्या वासाने सुगंधित झाला आहे. म्हणून सेवाग्राममध्ये दर्शनासाठी येणारे गांधीवादी येथील माती कपाळाला लावून जातात आणि मावशी केळकरांच्या घरी येणा-या सेविका नतमस्तक होतात. ही भूमी चिंतन आणि चळवळीची आहे. वर्धेत फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच काळात विद्रोही संमेलनही झाले. sarvodaya ashram wardha गेल्या दोन दिवसांपासून सेवाग्राम येथील बापूकुटीपुढे असलेल्या शांती निवासात महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या सर्व सेवा संघाच्या अमृत महोत्सवी वर्षात गांधी विचारांचे ‘सर्वोदयी' संमेलन होत आहे.
 

wardha  
 
संमेलन कोणतेही असू देत त्यात वाद अटळच असतो. sarvodaya ashram wardha सर्व सेवा संघातील वाद अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर आलेला आहे. अगदी अहिंसेचे पाईक असणा-यांनी फक्त चिमूटभर मिठासाठी चावा घेत हिंसेचा प्रकारही याच सेवाग्राम आश्रम परिसरात झाल्याचे सर्वश्रुत आहे. सर्व सेवा संघाच्या कार्यप्रणालीवरही त्यांच्यातीलच काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सर्व सेवा संघ सध्या दोन गटात विभागला आहे. त्यामुळे महादेव विद्रोही यांनी सेवाग्राम येथे सुरू असलेले संमेलन अनैतिक असल्याचा आरोप केला तर आयोजकांनी महादेव विद्रोही यांना या संमेलनाविषयी बोलण्याचा अधिकारच नसल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. sarvodaya ashram wardha हे संमेलन गांधीवाद्यांचे की काँग्रेसचे हा प्रश्नही विद्रोही यांनी उपस्थित केला असताना गांधी विचारक तीन दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करीत आहेत. त्या चर्चेतून देशहिताय चांगलेच निघावे ही रास्त अपेक्षा. या संमेलनात गांधी विचारांचा पाया मजबूत करण्याविषयीची चर्चा होत असताना आमचे खांदे कमकुवत झाल्याचे मान्य करण्यात आले. sarvodaya ashram wardha परंतु, खांदे कमकुवत होण्यामागील कारणांची मीमांसा होण्यापेक्षा आज देश कोणत्या वळणावर जातो आहे, या विषयावरच आलटून पालटून गाडी येऊन थांबत असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
 
 
sarvodaya ashram wardha देशात सर्वात जास्त चघळला जातो तो विषय म्हणजे राजकारण! या संमेलनातील चर्चेचा नूरही राजकारणच! काल झालेल्या चर्चेत प्रतिक्रिया कृतीत बदलली पाहिजे यावर एकमत झाले आणि तो ठरावही पारित झाला. चांगल्या कामाचे कौतुक करण्याची आपली संस्कृती आहे. या कृतीचा ‘हात'भार देशाच्या विकास कार्याला लागत असेल तर त्या ठरावाचे स्वागतच व्हावे! sarvodaya ashram wardha परंतु, देशात १९४८ च्या परिस्थितीप्रमाणेच आजचे वातावरण असल्याची भावना व्यक्त करणे म्हणजे देशातील राजकारणावरच चर्चा करणे नव्हे का? अशा चर्चा येथे होत असतील तर त्याला राजकीय व्यासपीठ म्हणावे का? की देशातील राजकारणात दुबळा ठरत असलेल्या काँग्रेसला बळ देण्यासाठीचा छुपा अजेंडा तर सर्वोदयी संमेलनाच्या माध्यमातून राबवला जात नाही, असाही प्रश्न या विविध विषयांवरील चर्चांमधून उपस्थित होत आहे. sarvodaya ashram wardha उद्घाटन सत्रात एका वक्त्याने आजपर्यंत सर्वोदयाच्या संमेलनात येण्यासाठी रेल्वेच्या प्रवासात आम्हाला सवलत मिळत होती. यावेळी मात्र पैसे खर्च करून यावे लागल्याची खंत व्यक्त करीत केंद्र सरकारच्या धोरणावर एक प्रकारे टीकाच केली.
 
 
दुसरीकडे ‘विकासाच्या नावावर शोषण' या चर्चासत्रात मोफत देणे हे व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी बाब असल्याचेही विचार त्याच व्यासपीठावर व्यक्त केल्याने एकाच व्यासपीठावर सर्वोदयी विचारांचा दुटप्पीपणा पुढे आला. sarvodaya ashram wardha याच चर्चासत्रात आजची विकास प्रक्रिया निसर्गाचे शोषण आणि दोहन करीत असल्याचा आरोपही केला गेला. विकासामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण होत असल्याची टीका केली गेली. मग, ही दरी कोणत्या काळात नव्हती, यावरही चिंतन होणे गरजेचे असून त्या काळाप्रमाणे नियम, कायदे आणि सत्ता राबविण्याचे आवाहन सरकारला करता येणे सोपे होईल. sarvodaya ashram wardha गरीब आणि श्रीमंत हा विषय आजचा नाही किंवा कोणी तो निर्माणही केला नाही तर तो अनादिकाळापासून चालत आलेला आहे. ही दरी कमी व्हायलाच पाहिजे यात कोणाचेही दुमत नाहीच. परंतु, त्यासाठी ठोस अशी भूमिका मांडण्याची जबाबदारीही टीकाकारांचीच ठरावी! sarvodaya ashram wardha पण, त्यासाठी दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही. विरोधासाठी विरोध नको तर चांगले ते स्वीकारण्याची ताकदही ठेवावी लागेल. अन्यथा ‘भूदान घोटाळा' हा गांधी विचारांना तिलांजलीच नाही का?
९८८१९०३७६५