जयपूर,
Khayali Saharan 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' फेम प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन खयाली सहारन याच्याविरुद्ध जयपूरमधील मानसरोवर पोलिस ठाण्यात 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना तीन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉमेडियन खयाली याने मद्यधुंद अवस्थेत एका महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्याने मानसरोवर परिसरातील हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप आहे.
मानसरोवर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप यादव Khayali Saharan यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून विनोदी कलाकाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या एका दिवसानंतर या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला होता, असेही ते म्हणाले.