‘लव्ह जिहाद’सह धर्मांतरणविरोधात हुंकार

    दिनांक :17-Mar-2023
Total Views |
- मराठी नववर्षदिनी हिंदू हुंकार सभा
 
नाशिक, 
देशभरात वाढत असलेले लव्ह जिहादसारखे प्रकार, लॅण्ड जिहाद, धर्मांतरण या विरोधात नाशिकध्ये मराठी नववर्षदिनाच्या दिवशी Hindu Hunkar Sabha हिंदू हुंकार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतून हिंदू राष्ट्र निर्माणाची हाक देण्यासाठी साधू, संत-महंत तसेच लाखो हिंदू भाविकांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याची माहिती स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. बुधवार, 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे ही सभा होणार आहे.
 
 
Hindu Hunkar Sabha
 
भारतानंद महाराज म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये श्रद्धा वालकरसारखी लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहे. हिंदूंच्या जमिनीही बळकावण्याचे प्रमाण वाढत आहे, वनवासी पाड्यांसह शहरातही धर्मांतरणाचे प्रकार वाढत असल्याने Hindu Hunkar Sabha हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्याची वेळ आली. भविष्यातील आव्हानांचा वेध घेत सभेतून आवाज उठवला जाणार आहे. सकल हिंदू धर्माचे सक्षम भविष्य, सुसंस्कृत पिढी निर्माण, नवीन पिढीचे अस्तित्व टिकवण्यासह सभेमध्ये देशाच्या कल्याणासाठी सुधारित कायदे यावेत म्हणून सभेतून हुंकार दिला जाणार आहे.
 
 
सभेसाठी सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाण हे प्रमुख वक्त म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. Hindu Hunkar Sabha हिंदू हुंकार सभेसाठी आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरिगिरीजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी श्री शांतीगिरीजी महाराज, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री 1008 महामंडलेश्वर रघुनाथ बाबा, जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास लहवितकर, स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज उपस्थित राहणार आहे. हिंदू हुंकार सभेच्या नियोजनासाठी नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सभेस लाखोंच्यावर हिंदू बांधव उपस्थित राहणार असून, यावेळी विविध ठराव मांडले जाणार आहेत. या ठरावांद्वारे सरकारकडून कायदे तयार केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.