तभा वृत्तसेवा
नागपूर,
Manohar Bongirwar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, नूतन कन्या शाळेचे अध्यक्ष आणि भंडारा जिल्ह्यात दैनिक तरुण भारताच्या वितरण आणि वसुलीची जबाबदारी बरेच वर्ष सांभाळणारे मनोहरराव बोंगीरवार यांचे आज 17 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले. नूतन महाराष्ट— शाळेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या मनोहरराव बोंगीरवार यांनी राष्ट—ीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह म्हणून बरेच वर्ष दायित्व सांभाळले. महाराष्ट— राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली. शहरातील नावाजलेल्या नूतन कन्या शाळेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. इतरही अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सदैव सहभाग राहत होता. Manohar Bongirwar भंडारा व गोंदिया जिल्हा एक असताना दैनिक तरुण भारताचे वसुली आणि वितरण प्रतिनिधी म्हणून त्यांनी योगदान दिले. आजही भंडारा शहरात मिलिंद पेपर एजन्सी नावाने तरुण भारताच्या वितरणाची जबाबदारी त्यांचे चिरंजीव मिलिंद बोंगिरवार सांभाळीत आहेत. आज 17 मार्च रोजी वृद्धापकाळाने त्यांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आणि नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. नागपूर येथे त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.