मोहित रैनाला कन्यारत्न प्राप्त!

    दिनांक :17-Mar-2023
Total Views |
मुंबई,  
टीव्ही शो 'देवों के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैनाने Mohit Raina सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदितीने एका मुलीला जन्म दिला आहे, ज्याची एक झलक अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहते आणि सेलिब्रिटी मोहित आणि अदितीला शुभेच्छा देत आहेत. मोहित रैनाने काही वेळापूर्वीच इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मोहित रैनाने इंस्टा वर एक मोहक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची लहान मुलगी अभिनेत्याचे बोट धरून आहे. या फोटोसोबत मोहितने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'और ऐसे हम तीन हो गये...'. बाळाचे या जगात स्वागत आहे. 
 
vyt
 
गेल्या वर्षी १ जानेवारीला मोहित रैनाने Mohit Raina आदितीसोबत लग्न झाले. मोहितचे लग्नही त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राईजपेक्षा कमी नव्हते. लग्नाच्या जवळपास एक वर्षानंतर आता मोहितच्या घरी छोटा पाहुणा आला आहे, त्यामुळे चाहते खूप आनंदी आहेत आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत.अलीकडेच जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा होत्या आणि नंतर मोहितने सांगितले की तो अदितीला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही कारण ती या क्षेत्रातली नाही आणि तिला अनावश्यक लक्ष नको आहे.